Stepmom Stepson Crime News: बिहारमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहार शरीफमध्ये एका वडिलांनी आपल्या मुलाला विचित्र कृत्य करताना पाहिले. असे सांगितले जात आहे की तो तरुण त्याच्या सावत्र आईसोबत घाणेरडे कृत्य करत होता आणि वडिलांनी त्याला असे करताना पाहिले. त्यानंतर संतप्त वडिलांनी पुढे जे काही केले ते धक्कादायक होते. हरनौत पोलीस स्टेशन परिसरातील बडी मुधारी गावात हा प्रकार घडला.
तीन लग्नांची गोष्ट...
या प्रकरणात वडिलांचे नाव श्याम आहे तर मुलाचे नाव पिंटू आहे. गावकऱ्यांच्या मते, श्यामने आतापर्यंत तीन लग्न केलेली आहेत. पहिले लग्न १९९९ मध्ये झाले. पहिल्या बायकोपासून श्यामला पिंटू हा मुलगा झाला. २०१२ मध्ये पहिल्या पत्नीने आत्महत्या केली. त्याच वर्षी श्यामने दुसरे लग्न केले. दोन वर्षांनी ती घर सोडून निघून गेली. त्यानंतर २०१४ मध्ये त्याने नीलूशी तिसरे लग्न केले. त्याला तिच्यापासून दोन मुले आहेत.
वडील कामानिमित्त बाहेर, मुलगा सावत्र आईसोबत...
श्याम हा कामानिमित्त दिल्लीत राहायचा. त्यामुळे तो कधीकधीच घरी यायचा. मुलगा पिंटू त्याच्या सावत्र आईसोबत मुधारी येथे राहत होता. पिंटू अनेकदा तिच्याशी गैरवर्तन करायचा. १० ऑगस्टच्या रात्रीही पिंटू तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करत होता. श्यामने नेमके तेव्हाच पाहिले आणि त्याने विरोध केला. या प्रकरणावरून वडील आणि मुलामध्ये वाद झाला. पिंटूच्या सावत्र आईचे म्हणणे आहे की तो तिच्यासोबत चुकीचे कृत्य करत असे. पतीने ते पाहिल्यावर त्याला राग अनावर झाला आणि त्याने मुलगा पिंटूला ठार मारले.
पिंटूच्या आजोबांनी केला गुन्हा दाखल
श्यामला राग आल्यावर त्याने पिंटूचा टॉवेलने गळा दाबून खून केला. यानंतर, त्याचा मोठा भाऊ शैलेंद्र राम, मित्र दिना साव आणि त्याच्या एका काकांच्या मदतीने त्याने मृतदेह रुग्णवाहिकेत भरला आणि पाटणा जिल्ह्यातील अठमलगोलाजवळ गंगा नदीत फेकून दिला. पिंटूचे आजोबा सहदेव राम यांनी हत्येचा गुन्हा दाखल केला.
मृतदेह सापडला की नाही...
पोलिसांनी गंगा नदीत मृतदेह शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अद्याप मृतदेह सापडलेला नाही. हत्येनंतर मृतदेह गायब झाल्याची माहिती मिळताच पोलीस गावात पोहोचले होते. श्याम आणि त्याच्या पत्नीला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. त्यांनी हत्येची कबुली दिली. श्यामला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. अद्याप मृतदेह सापडलेला नाही.