शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

पैशांसाठी मुलानेच केला आईचा खून; मृत्यू आजारपणाने भासवण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2025 13:01 IST

Gondia : गळा दाबून डोकं जमिनीवर आपटलं

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम दासगाव बुज येथील भारती सुरेंद्र सहारे (४४, रा. दासगाव बुज) यांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईचा जीव घेतला. प्रकरणी तिच्या १७ वर्षीय मुलावर सोमवारी (दि.३०) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती सहारे आपल्या १७ वर्षीय मुलासोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर गावातच नड्डे व अंडी विकून आपला उदरनिर्वाह करायची. भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. असेच पैसे मागण्यावरून गुरुवारी (दि.२६) रात्री दोन्ही मायलेकांत वाद झाला. या वादात मुलाने भारतीचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले, यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिला आहे.

व्हिसेरा तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूस डोक्यातील रक्तस्राव कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी १७ वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 

मृत्यू लपविण्याचा प्रयत्नभारतीच्या मृत्यूनंतर आरोपी मुलाने तिचा मृत्यू आजारपणाने झाला असल्याचे भासवून नातेवाईकांना फोन केला. शुक्रवारी (दि.२७) तातडीने गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले. नातेवाईकांची दिशाभूल करत मुलाने आईचा अंत्यसंस्कार केला. मृत्यू संशयास्पद वाटल्याने ग्राम हिवरा येथील पोलिस पाटील विनोद ईस्तारू नंदेश्वर (४५) यांनी शनिवारी (दि.२८) रावणवाडी पोलिसात तक्रार केली. त्यांच्या मोठ्या वडिलांची मुलगी भारती शहारे हिला तिच्या मुलाने मारून नातेवाईकांची दिशाभूल केली होती.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीgondiya-acगोंदिया