नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला लाजवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना बिहारच्या खगाडिया जिल्ह्यातून समोर आली आहे. आपल्या सासरी आलेल्या अवघ्या २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या तरुणाचे लग्न होऊन केवळ एक महिना झाला होता. पत्नीचे तिच्या स्वतःच्या भावोजीशी असलेल्या अनैतिक संबंधांतून हा खूनी खेळ खेळला गेल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
लग्नानंतर अवघ्या एका महिन्यातच 'कपाळ पांढरं'
बेगुसराय जिल्ह्यातील डंडारी गावचा रहिवासी असलेला टोनिश यादव याचे महिनाभरापूर्वीच लग्न झाले होते. तो आठ दिवसांपूर्वी मथार जंली टोला येथील आपल्या सासरी आला होता. गुरुवारी सकाळी तो आपल्या घरी परतणार होता. मात्र, घराची ओढ लागलेल्या टोनिशला सासरच्या मंडळींनी मृत्यूच्या दारात ढकलले. घरातून निघण्यापूर्वीच अज्ञात आरोपींनी त्याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
अनैतिक संबंधांचा अडसर दूर करण्यासाठी 'काटा' काढला!
या घटनेनंतर टोनिशच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप सुन्न करणारे आहेत. नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, टोनिशच्या पत्नीचे तिच्या बहिणीचा पतीसोबत म्हणजेच भावोजीसोबत प्रेमसंबंध होते. हे तिचे दुसरे लग्न होते आणि ती या नात्यात अजिबात आनंदी नव्हती. आपल्या प्रेमाच्या आड येणाऱ्या पतीचा काटा काढण्यासाठी तिने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने हा कट रचल्याचा आरोप टोनिशच्या भावांनी केला आहे.
पत्नी, सासू आणि सासरा गजाआड
या प्रकरणाची माहिती मिळताच मुफस्सिल पोलीस ठाण्याच्या प्रभारी संगीता कुमारी यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत टोनिशची पत्नी, सासू, सासरे आणि मेव्हणी अशा चौघांना अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी भावोजी सध्या फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.
मजुरी करून चालवायचा संसाराचा गाडा
टोनिश हा पाच भावांमध्ये सर्वात लहान होता. कुटुंबाची आर्थिक ओढताण कमी करण्यासाठी तो मजुरीचे काम करत असे. लग्नानंतर सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या या तरुणाचा असा अंत झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास करत असून, मुख्य आरोपीला लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Web Summary : In Bihar, a 22-year-old groom was murdered at his in-laws' house. The motive is suspected to be his wife's affair with her sister's husband. Wife, in-laws, arrested; brother-in-law absconding.
Web Summary : बिहार में ससुराल में 22 वर्षीय दूल्हे की हत्या कर दी गई। पत्नी का अपनी बहन के पति के साथ प्रेम संबंध होने का संदेह है। पत्नी, ससुराल वाले गिरफ्तार; बहनोई फरार।