शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Crime: स्कूटरची चावी देण्यास नकार दिल्यानं जावई भडकला; पत्नीसह सासू-सासऱ्याला जिवंत पेटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 16:59 IST

Karnataka Bangalore Crime News: कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये रागाच्या भरात एका तरुणाने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. सासरच्या मंडळींनी फिरायला जाण्यासाठी स्कूटर देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या जावयाने पत्नी, सासू आणि सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवून दिले.

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये रागाच्या भरात एका तरुणाने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. सासरच्या मंडळींनी फिरायला जाण्यासाठी स्कूटर देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या जावयाने पत्नी, सासू आणि सासऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना जिवंत पेटवून दिले. या थरारक घटनेमुळे संपूर्ण बेंगळुरू शहरात खळबळ उडाली.

बेंगळुरूच्या ताराबानहल्ली परिसरात राहणारी २७ वर्षीय सुमलता ही घरकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. रविवारी तिचा पती, पांडुरंगा (वय-३२, रा- नंदिनी लेआउट) हा तिच्या घरी आला. पांडुरंगाने सुमलताकडे तिची स्कूटर मागितली. मात्र, काही कारणास्तव सुमलताने स्कूटर देण्यास नकार दिला. या किरकोळ कारणावरून दोघांमध्ये जोरदार भांडण सुरू झाले. वाद वाढत असल्याचे पाहून सुमलताच्या आई-वडिलांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यामुळे संतापलेल्या पांडुरंगाने स्वतःसोबत आणलेल्या बाटलीतील पेट्रोल काढले आणि काही कळण्याच्या आत सुमलतासह तिच्या आई-वडिलांवर ओतले. तसेच तिघांनाही पेटवून दिले.

घरातून आगीच्या ज्वाळा आणि ओरडण्याचे आवाज ऐकताच शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला. शेंजाऱ्यांनी त्यांना ताबडतोब जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, या हल्ल्यात तिघेही गंभीररित्या होरपळले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. या घटनेनंतर आरोपी घटनेनंतर आरोपी पांडुरंगा घटनास्थळावरून पसार झाला.

या घटनेची माहिती मिळताच सोलादेवनहल्ली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. आरोपीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये खूनाचा प्रयत्न (कलम १०९) आणि गुन्हेगारी धमकी (कलम ३५१-२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून रविवारी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Son-in-law Enraged by Scooter Refusal, Sets Family Ablaze

Web Summary : In Bengaluru, a man, denied a scooter by his in-laws, doused his wife and her parents with petrol and set them on fire. All three are critically injured. The accused is arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी