शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
4
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
5
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
6
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
7
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
8
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
9
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
10
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
11
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
12
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
13
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
14
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
15
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
16
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
17
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
18
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
19
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
20
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!

वडिलांना लुटणाऱ्या आरोपींना मुलाने दाखविली कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2020 8:58 PM

वडिलांना लुटल्याची माहिती कळताच त्यांचा १५ वर्षीय मुलगा पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे काही तासातच लुटारू ऑटोचालकाची टोळी पोलिसांच्या कोठडीत पोहचली.

ठळक मुद्देनागपुरातील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा : लुटारू ऑटोचालकाची टोळी जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबादला जायला निघालेल्या एका जवानाला ऑटोचालकाने रात्रीच्या वेळी निर्जन ठिकाणी नेले. तेथे साथीदारांच्या मदतीने मारहाण करून त्यांना लुटले. वडिलांना लुटल्याची माहिती कळताच त्यांचा १५ वर्षीय मुलगा पोलीस ठाण्यात पोहचला आणि त्याने दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे काही तासातच लुटारू ऑटोचालकाची टोळी पोलिसांच्या कोठडीत पोहचली. एखाद्या सिनेमातील वाटावी, अशी ही रियल स्टोरी धंतोली परिसरात रविवार रात्री ते सोमवारी पहाटेदरम्यान घडली.एमआयडीसी हिंगणा परिसरातील इसासनीत राहणारे राजकिशोरसिंग शिवनाथसिंग (वय ४१) हैदराबादला एका कंपनीत कार्यरत आहेत. ते येथे परिवाराच्या भेटीसाठी दोन आठवड्यातून एकदा येतात. शनिवारी येथे आल्यानंतर त्यांनी नेहमीप्रमाणे रविवारी रात्री हैदराबादला परतण्याची तयारी केली. हिंगणा मार्गावरील सीआरपीएफ बस थांब्याजवळून रविवारी रात्री १०.३० ला ते ऑटोत (एमएच ३१/ ईपी १८४६) बसले. सीताबर्डीत येऊन येथून हैदराबादला जाण्याचा त्यांचा बेत होता. ऑटोचालक आरोपी नीलेश ऊर्फ टकल्या निस्ताने याला सिंग यांच्याकडे मोठी रोकड असल्याचा संशय आला. त्यामुळे त्याने त्याचे साथीदार राहुल गौतम राऊत (वय २१), जिगर संजय काटेवार (वय २३) आणि एका अल्पवयीन साथीदाराला काही अंतरावर आपल्या ऑटोत बसवून घेतले. धावत्या ऑटोत आरोपींनी सिंग यांना भरपूर दारू पाजली आणि त्यांना धंतोलीतून चुना भट्टी, जुनी अजनी परिसरातील रेल्वेट्रॅकवर नेले. तेथे त्यांनी सिंग यांना लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, मजबूत शरीरयष्टीच्या सिंग यांनी तीव्र प्रतिकार केला. त्यामुळे त्यांच्यावर आरोपींनी दगडफेक करून त्यांना गंभीर जखमी केले. त्यानंतर त्यांच्या खिशातील पाचशे रुपये आणि मोबाईल हिसकावून आरोपी पळून गेले. रक्ताने माखलेले सिंग कसेबसे धंतोली ठाण्यात पोहचले. तत्पूर्वी त्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही लुटमारीच्या घटनेची माहिती दिली. त्यामुळे त्यांचे कुटुंबीय धंतोली ठाण्यात पोहचले. पोलिसांनी त्यांची तक्रार नोंदवून आरोपींबाबत विचारपूस सुरू केली.सहज झाले पोलिसांचे काम !सिंग यांच्या मुलाने त्यांना ऑटोत बसविल्यानंतर आरोपी टकल्याच्या ऑटोचा क्रमांक टिपून ठेवला होता. त्याने तो पोलिसांना दिला. त्यामुळे पोलिसांचे काम सुलभ झाले. त्या क्रमांकाच्या ऑटोचालकाचा शोध घेत पोलिसांनी सोमवारी पहाटे टकल्याला पकडले. त्यानंतर दिवसभरात राऊत आणि काटेवारसह अल्पवयीन आरोपीलाही ताब्यात घेतले. त्यांना आज कोर्टात हजर करून त्यांचा २३ जानेवारीपर्यंत पीसीआर मिळवण्यात आला. अवघ्या काही तासात गुन्हेगारांच्या मुसक्या बांधण्याची कामगिरी परिमंडळ दोनच्या उपायुक्त विनीता शाहू, सहायक आयुक्त रेखा भवरे आणि ठाणेदार विजय आकोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक डी. पी. नरोटे, उपनिरीक्षक वानखेडे, हवलदार दिनेश काकडे, राजेश भोंगाडे, प्रभाकर तभाने, आसिफ शेख, नायक वीरेंद्र गुळरांधे, राजेंद्र खंडाते, विनोद वडस्कर, दिनेश घुगे, पंकज हेडावू आणि पोलीस शिपायी प्रमोद सोनवणे यांनी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRobberyचोरीArrestअटक