शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

आईचा खून करणाऱ्या फरार मुलाला ३२ महिन्यांनी अटक, कोलकात्यातून पोलिसांनी केले जेरबंद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2021 11:13 IST

२९ जानेवारी २०१९ ला आरोपी मुलगा उन्मेश (२२) याने चाकू व सुऱ्याच्या मदतीने आई-वडिलांवर ३५ ते ४० सपासप वार केल्याच्या घटनेने नालासोपारा शहरात खळबळ उडाली होती.

नालासोपारा : शहरात २९ जानेवारी २०१९ ला पहाटे पावणेचारच्या दरम्यान मुलाने चाकू, सुरा, हातोडी आणि स्क्रू ड्रायव्हरने आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला करून आईची हत्या केल्याची घटना घडली होती. तेव्हापासून फरार असलेल्या आरोपी मुलाला नालासोपाऱ्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने ३२ महिन्यांनी कोलकाता शहरातून सोमवारी संध्याकाळी अटक केली.२९ जानेवारी २०१९ ला आरोपी मुलगा उन्मेश (२२) याने चाकू व सुऱ्याच्या मदतीने आई-वडिलांवर ३५ ते ४० सपासप वार केल्याच्या घटनेने नालासोपारा शहरात खळबळ उडाली होती. आरोपी मुलगा घटना झाल्यानंतर दुचाकीने बडोदा येथे पळून गेला होता. नंतर तिथून दिल्लीत एका हॉटेलमध्ये वर्षभर काम करत होता. तेथून तो कामाच्या शोधात नेपाळला गेला होता, पण काम न मिळाल्याने तो दिल्लीत परत आला होता. काही महिन्यांपूर्वी तो कोलकाता शहरातील एका मॉलमध्ये कॅशियर म्हणून काम करत होता. कोणताही धागा नसताना आरोपी कोलकाता येथे असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, पोलीस नाईक सचिन कांबळे, आदिनाथ कदम या तिघांची टीम कोलकाता येथे गेली होती. चार दिवसांपासून सापळा रचून आरोपी मुलाला मॉलमध्ये पकडून तेथील न्यायालयात हजर करून ट्रान्झिट रिमांड घेऊन नालासोपारा पोलीस ठाण्यात सोमवारी संध्याकाळी आणले.दरम्यान, नालासोपाऱ्याच्या पाटणकर पार्क रोडवरील इम्पिरियल टॉवरमध्ये वडील नरेंद्र पवार आणि आई नर्मदावर मुलगा उन्मेश नरेंद्र पवार (२०) याने शेअर मार्केटमध्ये पैशांच्या केलेल्या गुंतवणुकीत नुकसान झाल्यावरून झालेल्या वादामधून २९ जानेवारी २०१९ ला पहाटे पावणेचारच्या सुमारास झोपलेले वडील नरेंद्र रामचंद्र पवार (५३) आणि आई नर्मदा (५०) यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. आई नर्मदा ही गंभीर जखमी झाली होती. १८ दिवस मृत्यूशी झुंज देत असताना तिचा मृत्यू झाला होता.

आई-वडिलांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपी मुलाला ३२ महिन्यांनी कोलकाता येथून अटक करून आणले आहे. मंगळवारी वसई न्यायालयात हजर केल्यावर २५ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.- चंद्रकांत जाधव, सहायक पोलीस आयुक्त 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMumbaiमुंबईwest bengalपश्चिम बंगाल