शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावरून मोठमोठ्या गुंडांना धमकावणाऱ्या रेखा मीणाला अटक, कशी बनली लेडी डॉन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 14:09 IST

Rajasthan Crime News : सोशल मीडियावर पिस्तुलासोबत रील्स बनवणारी लेडी डॉन रेखा मीणा तिच्या विरोधा गॅंगला नेहमीच आव्हान देत होती. असं सांगितलं जातं आहे की, 19 वर्षीय रेखाला लेडी डॉन म्हणवून घेणं आवडत होतं.

Rajasthan Crime News : राजस्थानच्या करौलीमध्ये लेडी डॉन रेखा मीणाला पोलिसांनी अटक केली आहे. हत्येचा प्रयास या केसमध्ये रेखा फरार होती. तिला जयपूरच्या रामनगरियामध्ये पोलिसांनी अटक केली. करोलीमध्ये रेखा आणि तिच्या साथीदारांविरोधात हत्येचा प्रयत्न असा गुन्हा दाखल झाला होता. 

सोशल मीडियावर पिस्तुलासोबत रील्स बनवणारी लेडी डॉन रेखा मीणा तिच्या विरोधा गॅंगला नेहमीच आव्हान देत होती. असं सांगितलं जातं आहे की, 19 वर्षीय रेखाला लेडी डॉन म्हणवून घेणं आवडत होतं. तिच्या भागातील मोठमोठे बदमाश तिला घाबरत होते. रेखा मीणा आपल्या प्रत्येक मुव्हमेंटची अपडेट सोशल मीडियाववर शेअर करत होती. तिला हजारो लोक फॉलो करत होते.

करौलीला राहणाऱ्या योगेश जादौनने तिच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. तो शाळेतून येत होता तेव्हा दुपारी अडीच वाजता अंजनी माता मंदिरजवळ दोन तरूणी आणि चार तरूण दारू पित होते. त्यांना दारू पिण्यास टोकलं  तर एका तरूणाने त्याच्यावर गोळी झाडली. ज्यानंतर तो गंभीर जखमी झाला. या केसमध्ये रेखाचंही नाव होतं आणि तेव्हापासून ती फरार होती.

जयपूर ईस्ट डीसीपी राजीव पचार यांनी सांगितलं की, टोडाभीमच्या नांगला लाट येथे राहणाऱ्या आरोपी रेखा मीणाबाबत सूचना मिळाली होती की, ती जयपूरमध्ये आहे. नंतर पोलिसांनी प्लान करून  तिला अटक केली. 

19 वर्षीय रेखा करौली जिल्ह्यातील टोडाभीम येथील नागल लाट गावात राहणारी आहे. तिच्या आईचं निधन झालं आहे आणि वडील कमल मीणा मजुरी करतात. जानेवार 2020 मध्ये रेखा तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा तिने कुख्यात पप्पुलाल मीणा याला जीवे मारण्याची धमकी दिली होती. धमकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी रेख मीणाला अटक केली होती. तेव्हापासून रेखा मीणाला करौलीची लेडी डॉन म्हणून ओळखलं जाऊ लागलं.  2022 मध्ये फेसबुकवर तिचे अनेक अकाउंट आणि पेज आहेत. त्यावर तिचे फोटो आहेत. रेखा सोशल मीडियावर विरोधकांना थेट आव्हान देते.

टॅग्स :Rajasthanराजस्थानCrime Newsगुन्हेगारी