नालासोपारा : विरारच्या अर्नाळा परिसरात राहणाऱ्या मोठ्या भावाने लहान भावाकडे पैशाचा हिशोब मागितल्याच्या रागावरून लहान भावाने चक्क मोठ्या भावावर चारचाकी गाडी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या घटनेत मोठ्या भावाच्या मित्रालाही जखमी केले.विरार पश्चिमेकडील अर्नाळा गावातील द्वारकानाथ कॉंप्लेक्समध्ये राहणारे रमजान सुलतान खान आणि आगाशी येथे राहणारा अल्लाउद्दीन सुलतान खान हे दोघे सख्खे भाऊ आहे. यांचा खडी मशीनचा व्यवसाय आहे. रमजान यांनी लहान भाऊ अल्लाउद्दीन याला क्रशर मशीनचा हिशोब मागितला. हाच राग मनात धरून आरोपी अल्लाउद्दीन हा शनिवारी दुपारी शिवाजी बिल्डिंगच्या दुकान नंबर २ येथील चौपाटी आईस्क्रीम दुकानाजवळ आला. मोठा भाऊ व त्याचा मित्र राबहादूर तोमर हे बाहेर उभे असताना आरोपीने त्याची स्कोडा कार भरधाव वेगाने दोघांच्या अंगावर घालून जोरदार ठोकर दिली व नंतर ती गाडी दुकानाच्या शटरवर धडकली. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले आहेत.
म्हणून लहान भावाने मोठ्या भावावर चढवली गाडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2020 02:50 IST