शहरं
Join us  
Trending Stories
1
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
3
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
4
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
5
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
6
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
7
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
8
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
9
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
10
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
11
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
12
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
13
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
14
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
15
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
16
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
17
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
18
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
19
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
20
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला

...म्हणून पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या घालून केला पत्नीच्या हत्येचा प्रयत्न  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:44 IST

ही घटना शनिवारी रात्री घडली आहे.

ठळक मुद्देदरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने रागाने सोनीने आपली पत्नी सुनीता सोनी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला. झाडलेली गोळी डोक्याच्या वरच्या बाजूस गेली त्यामुळे पत्नीचा जीव वाचला. मोहाली येथील सेक्टर ६८ मधील युनाइटेड कोऑपरेटिव्ह सोसायटीत हे पती - पत्नी राहतात. 

चंदीगड - सिंघम म्हणून ओळख असलेल्या डीएसपी अतुल सोनी या पोलीस अधिकाऱ्यांविरोधात पंजाब पोलिसांत हत्येचा प्रयत्न (कलम ३०७) आणि घरगुती हिंसाचार (कलम ४९८ - अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने रागाने सोनीने आपली पत्नी सुनीता सोनी यांना गोळ्या घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला.ही घटना शनिवारी रात्री घडली आहे. अतुल सोनी दुपारी अडीचच्या सुमारास घरी परतला. झोप लागली असल्यामुळे पत्नीने घराचा दरवाजा बराच वेळ उघडला नाही. दरवाजा उघडण्यास उशीर झाल्याने डीएसपी सोनी इतका संतप्त झाला की त्याने पत्नीवर गोळी झाडली. मात्र, यात पत्नी थोडक्यात बचावली. झाडलेली गोळी डोक्याच्या वरच्या बाजूस गेली त्यामुळे पत्नीचा जीव वाचला. चंदीगड येथे शनिवारी सायंकाळी एका पार्टीसाठी सोनी पती - पत्नी गेले होते. तेथे दोघांत भांडण झाल्याने दोघे वेगवेगळ्या वाहनांनी घरी परतले होते असल्याची माहिती पत्नीने पोलिसांना दिली. मोहाली येथील सेक्टर ६८ मधील युनाइटेड कोऑपरेटिव्ह सोसायटीत हे पती - पत्नी राहतात. हल्ल्यानंतर डीएसपीच्या पत्नीने मोहाली पोलीस ठाण्यात तिच्या पतीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अतुल सोनीने त्याच्या सर्व्हिस रिवॉल्व्हरवरून नव्हे तर बेकायदेशीर रिव्हॉल्व्हरवरून गोळी चालविली असल्याचा आरोप आहे. सोनीच्या पत्नीनेही या घटनेत वापरलेली शस्त्रे आणि काडतुसे पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिली आहेत. अतुल सोनी सध्या फरार आहे. जुन्या रेकॉर्डवरून अतुल सोनीने बर्‍याच पंजाबी चित्रपट आणि व्हिडिओमध्येही काम केले आहे आणि बॉडी बिल्डिंगमध्येही पंजाब पोलिसांचा लोकप्रिय चेहरा आहे. यापूर्वीही बर्‍याचदा तो वादात अडकला होता. जून २०१२ मध्ये त्याला दिल्ली विमानतळावर शस्त्र कायद्यांतर्गत अटक करण्यात आली. मार्च २०१३ मध्ये सोनीविरोधात खंडणी व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच गेल्या वर्षी मार्चमध्ये सोनीच्या मुलाला रोड अपघाताच्या प्रकरणात अटक केली होती. त्यांच्या कारनेच एकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला होता. 

टॅग्स :FiringगोळीबारPoliceपोलिस