शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
3
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
4
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
5
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
6
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
7
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
8
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
9
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
10
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
11
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
12
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
13
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
14
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
15
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
16
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
17
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
18
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
19
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
20
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार

... म्हणून त्याने १८ फुटांवरून प्रेयसीला फेकले खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 08:49 IST

Crime News: कॉल सेंटरमधील नोकरी सुटली म्हणून तणावात असलेल्या प्रेयसीने प्रियकरासोबत दारूचा बेत आखला. दोघेही दारूच्या नशेत मित्राच्या गच्चीवरील १८ फुटांवर असलेल्या टाकीवर चढले.

मुंबई : कॉल सेंटरमधील नोकरी सुटली म्हणून तणावात असलेल्या प्रेयसीने प्रियकरासोबत दारूचा बेत आखला. दोघेही दारूच्या नशेत मित्राच्या गच्चीवरील १८ फुटांवर असलेल्या टाकीवर चढले. दारूच्या नशेतच किरकोळ कारणावरून दोघांमध्ये खटके उडाले आणि त्याने तिला टाकीवरून खाली ढकल्याची घटना दहिसरमध्ये घडली. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक केली आहे. दहिसर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची १० वर्षांपासूनची ओळख आहे. यामध्ये २५ वर्षीय तरुणी जखमी झाली आहे. कॉल सेंटरमधील नोकरी सुटल्यामुळे ती तणावात होती. १३ नोव्हेंबरला तिने प्रियकरासोबत पार्टी केली. तेथून दिंडोशीतील एका मित्राच्या टेरेसवरील पाण्याच्या टाकीवर बसले. तेथे नशेमध्ये असताना दोघांमध्ये वाद झाला. याच रागात प्रियकराने तिला खाली ढकलले. १८ फुटांवरून खाली पडल्यामुळे ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 याप्रकरणी दिंडोशी पोलिसांनी हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला. पुढील तपासासाठी हा गुन्हा दहिसर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या अटकेच्या वृत्ताला दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील यांनी दुजोरा दिला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी