शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

...म्हणून बापानंच केली मुलीची हत्या; कल्याणमध्ये सापडलेल्या अर्धवट मृतदेहाचं गूढ उकललं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 20:09 IST

ऑनर किलिंगमुळे मुलीचा वडिलांनी जीव घेतला आहे. 

ठळक मुद्देपरधर्मीय मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधास विरोध असल्याने वडिलांनीच केली मुलीची हत्या शीर आणि वरचा भाग त्यांने टिटवाळा येथे एका ठिकाणी पुरल्याचे आरोपी बापाने पोलिसांकडे कबूल केले आहे.

ठाणे - परधर्मीय मुलाशी असलेल्या प्रेमसंबंधाला विरोध असल्यानेच जन्मदात्या पित्यानेच पिन्सी या 22 वर्षीय मुलीची अत्यंत निर्घृणपणो हत्या केल्याचे ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त दीपक  देवराज यांनी सांगितले. मुंबईच्या मालाड भागातून अरविंद रमेशचंद्र तिवारी (47, रा. टिटवाळा, कल्याण, ठाणे) या खूनी पित्याला युनिट एकच्या पथकाने मोठया कौशल्याने अटक केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका बॅगेत तुकडे केलेल्या अवस्थेमध्ये तिचा मृतदेह 8 डिसेंबर रोजी पहाटे 5.25 वाजण्याच्या सुमारास मिळाला होता. याच दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानकाच्या बाहेर एक व्यक्ती मोठी बॅग घेऊन  गोवा नाका, भिवंडी येथे जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसला होता. परंतु, बॅगमधून दुर्गंध येत असल्याने रिक्षा चालकाला त्याचा संशय आला. त्याला या रिक्षा चालकाने हटकल्यानंतर हा प्रवाशी ती बॅग सोडून तिथून पळून गेला. याच बॅगेच्या तपासणीमध्ये एका 20 ते 25 वर्षीय महिलेचा कमरेपासून खालील शरीराचा तुकडे केलेला भाग मिळाला. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात खून आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. अर्धवट मिळालेल्या शरीरावरुन तिची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाकडे समांतर तपासासाठी सोपविले होते.  सीसीटीव्हीच्या आधारे संबंधित बॅग घेऊन येणारी व्यक्ती टिटवाळा ते कल्याण असा रेल्वेने आलेली दिसली.  या खूनातील आरोपी अरविंद तिवारी हा टिटवाळा (इंदिरानगर, साईनाथनगर चाळ, मांडा रोड) येथे वास्तव्याला असल्याची माहिती युनिट एकचे पोलीस नाईक संजय बाबर यांना मिळाली. तसेच तो मालाडमधील पवन हंस लॉजिस्टीक या ट्रान्सपोर्टमध्ये नोकरीस असल्याचीही माहिती मिळाली. याच माहितीच्या आधारे त्याला सोमवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, संजू जॉन, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस, सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु:हाडे, संदीप बागुल, समीर अहिरराव, भूषण दायमा आणि  पोलीस उपनिरीक्षक दतात्रय सरक आदींच्या पथकाने ताब्यात घेतले. त्याला आता महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून त्या मृतदेहाच्या शीर आणि धडाच्या भागाचाही त्याच्याकडून शोध घेण्यात येणार असल्याचे देवराज यांनी सांगितले.सलग 32 तास मेहनतगुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकांनी तसेच महात्मा फुले चौक पोलिसांच्या वेगवेगळया पथकांनी सलग 32 तास मेहनत घेऊन या अत्यंत क्लिष्ट अशा खून प्रकरणाचा तपास लावल्याचे देवराज म्हणाले. या पथकाचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी कौतुक केले असून त्यांना लवकरच बक्षिस दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.परधर्मीय प्रेमसंबंध अमान्य होते त्यामुळेच केला खूनअरविंद तिवारी याला प्रिन्सी हिच्यासह चार मुली आहेत. प्रिन्सी सर्वात मोठी होती. तिचे ती काम करीत असलेल्या भांडूप येथील एका इमारतीमधील परधर्मीय तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. हेच प्रेमसंबंध अरविंदला मान्य नव्हते. 6 डिसेंबर रोजी टिटवाळा, इंदिरानगर येथील आपल्या घरातच त्याने तिला आधी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध केले. त्यानंतर करवतीच्या सहाय्याने तिचे धड आणि कंबरेखालचा भाग वेगळा केला. 7 डिसेंबर रोजी संपूर्ण दिवस रात्र घरातच त्याने तिचे तुकडे केले. नंतर 8 डिसेबर रोजी पहाटेच्या सुमारास त्या प्रेमाची विल्हेवाट लावण्याच्या इराद्याने तो मृतदेहाचे तुकडे बॅगेत भरुन बाहेर पडला, अशी कबूलीही त्याने पोलिसांच्या चौकशीत दिली आहे. या सर्व प्रकरणाचा पुढील तपास आता महात्मा फुले चौक पोलीस करीत आहेत.हैद्राबादच्या घटनेमुळे सर्वाचे लक्षहैद्राबाद येथील पशुवैद्यकीय डॉक्टर तरुणीवर लैंगिक अत्याचार करुन तिची अत्यंत निर्घृणपणो हत्या करण्यात आली होती. या पाश्र्वभूमीवर या तरुणीच्या हत्याकांडाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. त्यामुळे या खूनाचा तपास लावणो हे पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते.माहीम पाठोपाठ कल्याण स्टेशन परिसरातील टॅक्सी स्टँडजवळ रविवारी पहाटे एका बॅगेत शीर नसलेला महिलेचा मृतदेह सापडला होता. याबाबतचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले होते आणि त्या सीसीटीव्हीत आरोपीचे चित्र कैद झाले होते. महिलेचा कमरेपासून अर्धा मृतदेह बॅगेत ठेवणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अरविंद तिवारी असे अटक करण्यात आरोपीचे नाव आहे. दुसऱ्या धर्मातील मुलाशी असलेले प्रेमसंबंध मान्य नसल्याने अरविंद तिवारी यांनीच मुलीची हत्या केली. नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वेगवेगळ्या बॅगेत ठेवले. त्यातील एक बॅग कल्याण स्टेशनबाहेर ठेवली होती. तर शीर आणि वरचा भाग त्यांने टिटवाळा येथे एका ठिकाणी पुरल्याचे आरोपी बापाने पोलिसांकडे कबूल केले आहे.

आरोपीला चार मुली आहेत. त्यापैकी मोठ्या मुलीची त्याने निघृण हत्या होती. त्याने राहत्या घरी त्यांनी मुलीची हत्या केली. मृतदेहाचा खालचा भाग तो कल्याण स्थानकावरुन नेत असताना हा प्रकार उघडकीस आला. कसलाही ठोस पुरावा हाती नसताना केवळ ३२ तासांत ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण आणि उल्हासनगर युनिटने ही कारवाई केली आहे.

टॅग्स :ArrestअटकMurderखूनkalyanकल्याणthaneठाणेPoliceपोलिस