शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

.. म्हणून लॉकडाऊनमध्ये दोन सख्ख्या भावांची चॉपरने हल्ला करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2020 15:41 IST

याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देचॉपरने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी अल्पवयीन भाऊ आणि शाहिद पटेलचा मृत्यू झाला तर जखमी झालेला अदनान याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी १२ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे.

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे गुन्हेगारीत घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुंबईत शिवडी क्रॉस रोड येथे लॉकडाऊन असतानाही डबल मर्डरची घटना घडली आहे. शिवडीमध्ये दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

मैदानात बसणे आणि बाईक पार्किंगच्या वादातून सोमवारी १२ वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडल्याची माहिती आहे. लॉकडाऊनच्या काळात घराबाहेर असलेल्या मैदानात बसलेल्या तीन भावंडांवर चॉपरने हल्ला करण्यात आला. त्यामध्ये दोन सख्ख्या भावांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मृतांपैकी एक मुलगा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. जखमीवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. चॉपरने केलेल्या हल्ल्यात गंभीर जखमी अल्पवयीन भाऊ आणि शाहिद पटेलचा मृत्यू झाला तर जखमी झालेला अदनान याच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

करीम युसूफ शेख(35), युसूफ उमर शेख (70), मिनाज युसूफ शेख(35), मेहराज युसूफ शेख(65) ही अटक केलेल्या चार आरोपींची नावे आहेत. यांनी शिवीगाळ करून हात आणि बुक्काने मारहाण करून धमकी दिली. तसेच करीम युसूफ शेख या आरोपीने त्याच्या हातातील तीक्ष्ण चाकूने अदनान व त्याच्या दोन भावांना वार करून गंभीर जखमी केले त्यांना केईम रुग्णालयात उपचाराकर्ता दाखल केले. तेव्हा दोघांना मृत घोषित करण्यात आले. रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात याप्रकरणी भा. दं. वि. कलम 302,307, 506, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्यातील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटकMumbaiमुंबई