शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून सासरच्या मंडळींनी जावयाचा घेतला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 17:51 IST

मुंबई -  सांताक्रुज पूर्व येथील गावदेवी परिसरातील मदर तेरेसा चाळीत आपल्या मुलांना भेटायला आलेल्या श्रीधर हरिजन (वय ३३) याची सासरच्या ...

मुंबई -  सांताक्रुज पूर्व येथील गावदेवी परिसरातील मदर तेरेसा चाळीत आपल्या मुलांना भेटायला आलेल्या श्रीधर हरिजन (वय ३३) याची सासरच्या मंडळींनी बेदम मारहाण करून हत्या केली आहे. याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सासरच्या सर्व मंडळींना वाकोला पोलिसांनी अटक केली आहे. 

मृत श्रीधर हरिजनचे राजेश्वरी हिच्याशी प्रेमविवाह झाला होता. त्यानंतर दोघांमध्ये सतत भांडण होत असे. तीन महिन्यांपूर्वी राजेश्वरी शेजारच्याच परिसरात राहणाऱ्या आई वडिलांकडे मुलांना घेऊन राहण्यास गेली. राजेश्वरीने १४ वर्षांचा मुलगा आणि १३ व ५ वर्षाच्या मुलीला देखील आपल्यासोबत नेले होते. श्रीधर रविवारीच आपल्या गावाहून म्हणजे तामिळनाडू येथून मुंबईत आला. त्यानंतर सोमवारी तो सासुरवाडीला आपल्या मुलांना भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी श्रीधरला मुलांना भेटू देण्यास सासरच्या मंडळींनी मनाई केली होती. त्यानंतर श्रीधरचे सासू, सासरे, भाचा आणि मेहुण्यासोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात लाथाबुक्यांनी व लोखंडी सळईच्या हुकाने श्रीधरला या चौघांनी मिळून बेदम मारहाण केली. तसेच मेहुण्याने चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले आणि त्याचा जीव घेतला. त्यानंतर श्रीधरला व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दाखलपुर्व त्याला मृत घोषित करण्यात आले. वाकोला पोलीस ठाण्यात याबाबत भा. दं. वि. कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून