शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

औषधाच्या नावे भांगेची तस्करी, ‘उत्पादन शुल्क’कडून ३५ लाखांचा माल जप्त, पाच अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 08:18 IST

या टोळीकडून दोन हजार २३२ किलोच्या भांगेच्या गोळ्यांसह ३५ लाख ७३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. 

ठाणे : आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्या मोहम्मद खलीद अली याच्यासह पाच जणांच्या टोळीला मुंबई आणि उल्हासनगरमधून अटक करण्यात आली. या टोळीकडून दोन हजार २३२ किलोच्या भांगेच्या गोळ्यांसह ३५ लाख ७३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती कोकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांनी दिली. उत्तर प्रदेशमधून मुंबई, ठाणेे जिल्ह्यात आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची विक्री होणार असून, ती सांताक्रूझ-चेंबूर लिंक रोड, चेंबूर येथून या गोळ्यांच्या मोठ्या साठ्याची वाहतूक होणार असल्याची माहिती उत्पादन शुल्क कोकण विभागीय भरारी पथकाचे निरीक्षक दिगंबर शेवाळे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनात भरारी पथकाने २५ ऑक्टाेबर रोजी चेंबूरच्या सहकारनगर बसस्टॉपसमोर सापळा रचून दोन टेम्पोची झडती घेतली.  या टेम्पोमधून परराज्यात तयार केलेला महाकाल  मुनक्कावटी या नावाचा भांगमिश्रित पदार्थांचा साठा आढळला.

मुंबईतून चौघांना अटक याप्रकरणी मोहम्मद खालिद अली,  इमरान हाफीज खान यांना अटक केली. चौकशीदरम्यान, लोकमान्य टिळक रेल्वे टर्मिनलच्या पूर्व भागातील रेल्वे स्टेशनच्या पार्सल ऑफिसबाहेर यातील अन्य एक मुख्य सूत्रधार  फारुख शेख याच्याकडूनही भांगमिश्रित शिलाजीत वटी पदार्थाचा साठा हस्तगत केला. त्याला अटकही केली. त्याच्या चौकशीतून मुंबईतील गिरगाव भागातून शेख शबीर शफील मोहम्मद याच्याकडूनही असाच भांगमिश्रित  शिलाजीत वटीचा साठा जप्त करत त्यालाही अटक केली.

उल्हासनगरातून एकाला बेड्या मिळालेल्या माहितीच्या आधारे उल्हासनगर क्रमांक एकमधून रवी कुकरेजा याच्याकडूनही अन्य  भांगमिश्रित शिलाजीत वटीचा साठा जप्त करून त्यालाही अटक केली. या संपूर्ण प्रकरणात आतापर्यंत दोन हजार २३२ किलो भांगमिश्रित पदार्थांचा साठा, दोन टेम्पो असा ३५ लाख ७३,४०० रुपये किमतीच्या मुद्देमालासह पाच आरोपींना अटक केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी