शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

तस्करांनी महिला पोलिसाला वाहनाखाली चिरडून मारले; झारखंडच्या रांचीजवळील खळबळजनक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 08:10 IST

झारखंडमध्ये रांचीजवळ गुरांची तस्करी करणाऱ्या लोकांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला व्हॅनखाली चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क 

रांची :झारखंडमध्येरांचीजवळ गुरांची तस्करी करणाऱ्या लोकांनी एका महिला पोलीस उपनिरीक्षकाला व्हॅनखाली चिरडल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. तुपुदानाच्या पोलीस ठाणे प्रभारी संध्या टोपनो (३२) असे या मृत उपनिरीक्षकांचे नाव आहे. 

या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, वाहन जप्त केले आहे. रांचीच्या तुपुदाना येथे संध्या टोपनो या वाहनांची तपासणी करत होत्या. यावेळी त्यांनी एका व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. मात्र, या व्हॅनने संध्या यांना धडक दिली. त्यानंतर चालक फरार झाला. संध्या यांना तातडीने उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

पोलिसांना सूचना मिळाली होती की, गो तस्कर मोठ्या प्रमाणात गुरांना व्हॅनमधून घेऊन जात आहेत. पोलिसांनी या व्हॅनचा पाठलाग केला. मात्र, बसिया पोलीस ठाण्याच्या पोलिसांना चकवा देत हे लोक पळाले. बसिया ठाण्याने ही माहिती रांची पोलिसांना दिली. रांची पोलिसांनी तुपुदाना ठाण्याच्या हुलहुन्दूजवळ वाहन तपासणी सुरू केली. दुपारी तीन वाजता एक पांढऱ्या रंगाची व्हॅन वेगाने आली. यावेळी पोलिसांनी या व्हॅनला थांबण्याचा इशारा केला. पण, चालकाने वाहन महिला पोलिसाच्या अंगावर धडकविले. येथून काही अंतरावर या तस्करांना पकडण्यात आले.

गुजरात : कॉन्स्टेबलच्या अंगावर ट्रक घातला 

गुजरातच्या आणंद जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशिरा एका पोलीस कॉन्स्टेबलने ट्रक रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने ट्रक कॉन्स्टेबलच्या अंगावर घातला. यात कॉन्स्टेबल करणसिंह राज (४०) हे गंभीर जखमी झाले. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना बोरसाद शहराजवळ घडली. ट्रकचालक वाहन सोडून फरार झाला आहे.

टॅग्स :Jharkhandझारखंडranchi-pcरांचीPoliceपोलिस