शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

एसीबीची मोठी कारवाई! अधिकाऱ्यांसह सहा पोलीस अडकले पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2020 22:07 IST

ऐतिहासिक कारवाई : तीन लाख मागितल्याचा गुन्हा

ठळक मुद्देआता तर थेट उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी अडकल्याने संपूर्ण राज्यातच जिल्हा पोलीस दलाची बदनामी होत आहे.यवतमाळ एसीबीचे उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

उमरखेड (यवतमाळ) - जिल्हा पोलीस दलाच्या इतिहासात पहिल्यांदा एसडीपीओ, ठाणेदार व सहायक पोलीस निरीक्षकासह सहा जणांना लाच मागितल्याच्या गुन्ह्यात अडकले. एसीबीच्या यवतमाळ पथकाने २९ फेब्रुवारीपासून सापळा लावला होता. शनिवारी लाचेचे ४० हजार देण्याचा प्रयत्न झाला. मात्र एसीबी पथक असल्याची कुणकुण लागल्याने लाच स्वीकारली नाही. अखेर लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरू होती. 

उमरखेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी विकास तोटावार, ठाणेदार संजय खंदाडे, सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगोले, जमादार सुुभाष राठोड यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी मुन्ना शुक्ला, शेख मुनीर असे लाचेची मागणी करणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्याची नावे आहेत. अडीच वर्षापूर्वी संस्थेच्या वादातून उमरखेडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता.  या गुन्ह्यातील दोषारोपपत्र मॅनेज करण्यासाठी तीन लाखांची लाच मागण्यात आली होती. संबंधित व्यक्तीने एसीबी पथकाकडे  पुराव्यानिशी तक्रार केली. यवतमाळच्या एसीबी पथकाने या तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. मोठे अधिकारी गळाला लागणार असल्याने अमरावती व वाशिम येथील एसीबी पथकाची मदत घेतली. ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे तीन लाखापैकी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारण्याचे पंचासमक्ष आरोपींनी मान्य केले. मात्र वेळेवर एसीबी पथक असल्याची कुणकुण लागल्याने सापळा यशस्वी झाला नाही.  अखेर या प्रकरणी लाच मागितल्याचा गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. एसीबीकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला. 

पोलीस उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी, ठाणेदार, सहायक पोलीस निरीक्षक एकाच वेळी एसीबीच्या गळाला लागले. याशिवाय जमादार व दोन कर्मचारीही या सापळा कारवाईत अडकले. एसीबीचा कारवाईने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. यवतमाळ एसीबीचे उपअधीक्षक राजेश मुळे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. 

यवतमाळ एलसीबीच्या प्रमुखालाही झाली होती अटक जिल्हा पोलीस दलात अनेक चुकीचे प्रकार सुरू आहेत. यामुळेच आता वरिष्ठ दर्जाचे अधिकारीही लाचेच्या गुन्ह्यात अडकत असल्याचे दिसून येते. यवतमाळ जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षकाला अमरावती एसीबीने अटक केली होती. त्यानंतरही पोलीस दलाचा कारभार सुधारला नाही. आता तर थेट उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी अडकल्याने संपूर्ण राज्यातच जिल्हा पोलीस दलाची बदनामी होत आहे.

टॅग्स :Anti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागYavatmalयवतमाळPoliceपोलिसArrestअटक