शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

87 कोटींच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी सहा जणांना 15 जून पर्यंत कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 18:19 IST

विमानतळ पोलिसांनी कारवाई करत ८७ कोटींच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या

ठळक मुद्दे विमानतळ पोलिसांची कारवाई

पुणे : आपआपसात संगनमत करुन तब्बल 87 कोटी रुपयांच्या बनावट नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. पुढील तपासासाठी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 जून पर्यंत कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. याप्रकरणी खंड्णी व अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडीक यांनी फिर्याद दिली होती.    रितेश रत्नाकर (वय 34, रा. कामोठे, नवी मुंबई), अब्दुलगणी रेहमततुल्ला खान (वय 43, रा. खुशिंदा टॉवर, नयानगर, ठाणे), तुफेल अहमद महंमद इसाक खान (वय 28, रा.अस्मिता पर्ल, ठाणे), शेख अलीम समद गुलाब खान (वय 36, रा. जेसीडी पार्क, प्रतिकनगर, येरवडा), सुनिल बद्रीनारायण सारडा (वय 40, कोंढवा बुद्रुक), अब्दुल रेहमान अब्दुलगणी खान (वय 19, रा. ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ही घटना 10 जुन रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास लोहगाव येथील संजय पार्क याठिकाणी घडली. या कारवाईत पाच मोबाईल फोन, 2 लाख 89 हजाराची रोख रक्कम, 1200 अमेरिकन डॉलर, भारतीय चलनातून बंद झालेल्या हजार, दोन हजार, पाचशे रुपयांच्या बनावट नोटा, मेटल डिटेक्टर, जप्त करण्यात आले आहेत. आरोपींनी या बनावट नोटा खऱ्या असल्याच्या भासवण्याच्या उद्देशाने फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे.    अटक आरोपी यांनी 87 कोटी 5 लाख  75 हजार रुपयांची बनावट रक्कम जवळ कशासाठी ठेवली, ती रक्कम त्यांना कोठून मिळाली, तसेच ती कुठे छापली याचा तपास करणे, याबरोबरच आरोपींचे मोठे रँकेट आहे काय याचा तपास करणे, आरोपींनी ज्या बंगल्यातून बनावट नोटा ठेवल्या होत्या त्या बंगल्याच्या मालकाची माहिती घेणे, आरोपींनी आणखी किती जणांना फसवले आहे ? आणि शेख अलीम समद गुलाब आरोपी संरक्षण दलातील लान्स लाईक पदावरील कर्मचारी असून या गुन्हयात तो मुुख्य सुत्रधार असल्याने त्याच्याकडे सखोल तपास करण्यासाठी कोठडीची मागणी सरकारी वकील नितीन कोंघे यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

टॅग्स :YerwadaयेरवडाfraudधोकेबाजीPoliceपोलिस