शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! बहिणीने बनवला अश्लील व्हिडीओ, मग भावाने ब्लॅकमेल करून मागितले ३० कोटी रूपये आणि...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2021 16:19 IST

हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा महानगरचा एक व्यापारी या बहिणीच्या आणि तिच्या दोन भावांच्या जाळ्यात अडकला. आरोपींनी व्यापाऱ्याकडे ३० कोटी रूपयांची मागणी केली होती.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौच्या महानगरमध्ये व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून ब्लॅकमेल करण्याची घटना समोर आली आहे.  ज्यात बहिणीच्या मदतीने दोन भाऊ अश्लील व्हिडीओ कॉल करवत होते. व्हिडीओ कॉल दरम्यान तरूणी लोकांचे कारनामे रेकॉर्ड करत होती आणि जेव्हा लोक जाळ्यात अडकत होते तेव्हा त्यांना ब्लॅकमेल केलं जात होतं.

हे प्रकरण तेव्हा समोर आलं जेव्हा महानगरचा एक व्यापारी या बहिणीच्या आणि तिच्या दोन भावांच्या जाळ्यात अडकला. आरोपींनी व्यापाऱ्याकडे ३० कोटी रूपयांची मागणी केली होती. महानगरच्या एसएचओंनी माहिती दिली की, गेल्या १५ जूनला व्यापारी आणि तरूणीत चॅटींग सुरू झाली होती. चॅटींग सुरू करण्याआधी एका अनोळखी नंबरवरून 'हाय' असा मेसेज व्यापाऱ्याला पाठवण्यात आला होता. (हे पण वाचा : ज्याच्यासाठी घर सोडून आली त्यानेच दाबला गळा, दुसरीसोबत लग्न करण्यासाठी पहिल्या गर्लफ्रेन्डची हत्या)

एसएचओनुसार, नंतर त्याच नंबरवरून व्हिडीओ कॉल आला आणि नंतर व्हिडीओ कॉलमध्ये महिलेने अश्लीलता सुरू केली. यादरम्यान तरूणीने व्यावसायिकाला फसवून सगळं काही रेकॉर्ड केलं आणि नंतर त्याच नंबरवरून तरूणीचा भाऊ मोहितने कॉल करून व्यापाऱ्याकडे ५ कोटी रूपयांची मागणी केली. 

व्यापाऱ्याने पोलिसांना सांगितलं की, ते म्हणाले होते की, जर पैसे दिले गेले नाही तर त्याच्या नातेवाईकांना आणि ओळखीच्या लोकांना हा व्हिडीओ पाठवून बदनाम केलं जाईल. बदनामीच्या भीतीने व्यापाऱ्याने ब्लॅकमेलरला ५ लाख रूपये देण्यास तयारी दाखवली. यानंतर फोनवरून ब्लॅकमेल करणारा मोहित सिंह आपला मोबाइल बंद करून आपल्या मोठ्या बहिणीकडे गेला. (हे पण वाचा : Shocking! १४ कोटींची लॉटरी जिंकल्यावर ९ महिन्यांनी पतीने पत्नी-मुलीची केली हत्या, नंतर केली आत्महत्या)

एसएचओंनी सांगितलं की, जेव्हा तरूणीने बघितलं की, तिचा भाऊ मोहितचा मोबाइल बंद आहे तर तिला वाटलं की, तिच्या भावाने व्यापाऱ्याकडे पैशांची मागणी केली नसेल. त्यामुळे ब्लॅकमेलर तरूणीने आपल्या मामे भावाला विवेक सिंहला व्यापाऱ्याला फोन करण्यास सांगितलं. त्याने व्यापाऱ्याला फोन करून शिव्या देऊन ३० कोटी रूपयांची मागणी केली. 

डीसीपी उत्तरी देवेश पांडे यांनी सांगितलं की, खंडणी मागितल्यावरून व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दाखल केली. ज्या दोन नंबरवरून ब्लॅकमेल करण्यात आलं ते नंबरही त्याने पोलिसांना दिले. नंतर पोलिसांनी दोन्ही आरोपी मोहित सिंह आणि विवेक यांना अटक केली. दोन्ही आरोपींची बहीण फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारी