पंजाबमधील गुरदासपूरमधून एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. जेथे एका कुटुंबातील 3 जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. मृतकच्या मुलाचा असा आरोप आहे की, जेव्हा त्याच्या आईने भावाकडे पैसे मागितले तेव्हा मामाने विष पाठविले आणि सांगितले कुटूंबासह विष पिऊन आत्महत्या करा नाही तर तो येऊन कुटुंबाला ठार मारेल.वास्तविक, हे प्रकरण गुरदासपूरच्या धारीवाल शहराशी संबंधित आहे. आरोपी भावाकडे आर्थिक मदतीसाठी विचारले असता बहिणीला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला. यामुळे बहिणीने प्रथम सोशल मीडियावर व्हिडिओ टाकला आणि न्यायाची मागणी केली. त्यानंतर तिने आपल्या १६ वर्षाची मुलगी आणि पतीसमवेत विष पिऊन आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचे नाव भारती शर्मा असे सांगितले जात आहे. त्याचा भाऊ प्रदीप शर्मा याच्याशी पैशाचा व्यवहार होता. सध्या पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.त्याचवेळी मृताचा मुलगा कुणाल शर्मा यांनी सांगितले की, आपल्या मामाकडे पैशाचा व्यवहार होता. जेव्हा त्याच्या आईने आपल्या भावाशी पैशाबद्दल बोलले तर त्याच्या मामाने विषारी औषधे पाठविली आणि सांगितले विषारी औषध घेऊन आत्महत्या केली नाही तर तो संपूर्ण कुटुंबाचा जीव घेईल. त्यानंतर रात्री कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ टाकून विष पिऊन आत्महत्या केली. या घटनेस आपला मामा आणि त्याचे साथीदार जबाबदार आहेत, ज्यामुळे त्याने आत्महत्या करण्यास भाग पाडले आहे, असा आरोप मुलाने केला आहे. त्याच्या मामा आणि त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी अशी त्याची मागणी आहे.
बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्...
By पूनम अपराज | Updated: December 24, 2020 18:49 IST
Suicide : सध्या पोलिसांनी १० जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
बहिणीने भावाकडे आर्थिक मदत मागितली, भावाने पाठविले विष अन्...
ठळक मुद्देवास्तविक, हे प्रकरण गुरदासपूरच्या धारीवाल शहराशी संबंधित आहे. आरोपी भावाकडे आर्थिक मदतीसाठी विचारले असता बहिणीला आत्महत्या करण्याचा सल्ला दिला.