शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

एटीएममधील सायरन वेळीच वाजल्याने चोरट्यांनी ठोकली धूम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 8:06 PM

एटीएम फोडत असताना सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले. 

औरंगाबाद : अगदी सकाळच्या वेळी एटीएम फोडण्याच्या तयारीने काही चोरटे हातात टॉमी आणि इतर साहित्य घेऊन निघाले. उस्मानपुऱ्यातील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवर ते पोहोचले. त्यांनी एटीएम फोडण्यास सुरुवातही केली. मात्र, रोकड असलेला ट्रे फोडण्याचा प्रयत्न करीत असताना अचानक एटीएममधील सायरन जोराने वाजू लागला. सायरन वाजल्याने चोरांची धांदल उडाली आणि त्यांनी लागलीच धूम ठोकली. या प्रकारात एटीएममधील२ लाख ७२ हजार ९०० रुपये मात्र सुरक्षित राहिले. 

क्रांतीचौककडून उस्मानपुऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सेंट्रल बँक आॅफ इंडियाच्या एटीएमवरील शुक्रवारी सकाळची ही घटना आहे. या एटीएमवर चोरट्यांनी सर्वात आधी एटीएम मशीनचे गेट लॉक आणि वायर तोडून त्यांनी आवरण काढून बाजूला फेकले. रोकड असलेला ट्रे फोडण्याचा प्रयत्न ते करीत असतानाच मशीनमधील सायरन वाजू लागला. सायरनच्या  आवाजामुळे पकडले जाण्याच्या भीतीपोटी त्यांनी तेथून धूम ठोकली. दरम्यान, एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याचा बँकेच्या मुंबईतील मुख्यालयास गेला. त्यानंतर गस्तीवरील पोलीस आणि उस्मानपुरा  ठाण्याचे निरीक्षक घोडके, उपनिरीक्षक कल्याण शेळके, गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत आणि कर्मचारी घटनास्थळी धावले. 

पोलिसांना आव्हानएटीएम फोडून त्यातील रोकड लुटण्याचे यापूर्वीही अनेक प्रयत्न शहरात झाले. मात्र आज चक्क सकाळी ७ वाजेच्या सुमारास चोरटे त्या एटीएम सेंटरमध्ये घुसले आणि त्यांनी निडरपणे एटीएम मशीन फोडले, सुदैवाने रोख रक्कम त्यांच्या हाती लागण्यापूर्वीच सायरन वाजल्याने ते पळाले. या चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणचे एटीएम फोडून पोलीस यंत्रणेला एक प्रकारे खुले आव्हान दिले. 

टॅग्स :atmएटीएमtheftचोरीAurangabad city policeऔरंगाबाद शहर पोलीस