शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे गट आमदाराच्या मुलाची गायक सोनू निगमला धक्काबुक्की; २ जखमी, गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 09:51 IST

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गायक आणि त्याच्या अंगरक्षकाला मारहाण केली.

मुंबई - बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमसोबत धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी संध्याकाळी मुंबईतील चेंबूर परिसरात ठाकरे गटाचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांच्यावतीने आयोजित फेस्टिवलमध्ये सोनू निगम उपस्थित होता. त्यावेळी सेल्फी घेण्याच्या वादातून आमदाराच्या मुलाची सोनू निगम आणि त्याच्या टीमसोबत झटापट झाली. सोनू परफॉर्म करत असताना स्थानिक आमदारानं सोनूची टीम मॅनेजर सायरासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप आहे. 

आमदाराच्या मुलाला सोनू निगमसोबत फोटो काढायचा होता, म्हणून तो स्टेजवर चढला. परंतु सोनू टीमने त्याला मज्जाव केला असता स्वप्निल आणि त्याचे कार्यकर्ते भडकले. सोनू स्टेजवरून खाली उतरत असताना त्याने गायकाला स्टेजच्या मागच्या पायऱ्यांकडे ढकलले. या प्रकरणी पोलिसांनी स्वप्निल फातर्पेकर याच्यावर गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास सुरू आहे अशी माहिती झोन ६ चे डीसीपी हेमराज सिंग राजपूत यांनी दिली. 

घटनेचा व्हिडिओ व्हायरलया घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. या संपूर्ण घटनेदरम्यान ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी गायक आणि त्याच्या अंगरक्षकाला मारहाण केली. सोनू निगम याला वाचवताना त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान हे दोन जण जखमी झाले, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सोनू निगमची कॉलर पकडण्याचा प्रयत्नमिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा सोनू निगमसोबत स्टेजवर झटापट सुरू होती. तेव्हा त्याच्या अंगरक्षकाने सोडवण्याचा प्रयत्न केला. सोनू निगमला ढकलले असता अंगरक्षक मध्ये आला तेव्हा त्यालाही धक्का दिल्याने तो पायऱ्यांवरून खाली पडला. दरम्यान, या व्यक्तीने पुन्हा सोनूला कॉलरने पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याचा सहकारी गायक रब्बानी खान याने सोनूला वाचवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यानंतर त्या हल्लेखोराने रब्बानी खान यांनाही जोरात ढकलले आणि तोदेखील पायऱ्यांवरून ७ फूट खाली जमिनीवर पडला. सुदैवाने, या झटापटीत सोनू निगमला दुखापत झाली नाही, परंतु त्याचा अंगरक्षक आणि गायक मित्र रब्बानी खान जखमी झाले.

 

टॅग्स :Sonu nigamसोनू निगमUddhav Thackerayउद्धव ठाकरे