शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंगर फरमानी नाझचे कुटुंबीय चोरटे निघाले; बाप, भाऊ, भावोजी सळ्या चोर गँगचे मास्टरमाईंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2022 13:03 IST

Singer Farmani Naaz : मेरठच्या सरधना पोलिसांनी आतापर्यंत फरमानीचा भाऊ आणि मेहुण्यासह आठ जणांना य़ाप्रकरणी अटक केली आहे, तर फरमानीचे वडील अद्याप फरार आहेत.

उत्तर प्रदेशच्या मेरठमधील प्रसिद्ध गायिक फरमानी नाझचा भाऊ अरमान आणि वडील आरिफ हे लोखंडी सळ्या चोरणाऱ्या गँगचे मास्टरमाईंड निघाले आहेत. मेरठच्या सरधना पोलिसांनी आतापर्यंत फरमानीच्या भावासह आठ जणांना य़ाप्रकरणी अटक केली आहे, तर फरमानीचे वडील अद्याप फरार आहेत. ज्याचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

महिनाभरापूर्वी मेरठमधील सरधना पोलीस स्टेशनच्या टेहरकी गावात बांधकाम सुरू असलेल्या टाकीवरील चौकीदाराला बांधून ठेवून काही लोकांनी अनेक क्विंटल लोखंडी सळ्या चोरल्या होत्या. एका खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून, पोलिसांनी रविवारी खिर्वा मार्गावर एक पिकअप अडवली. आरोपींना पकडून पोलीस ठाण्यात आणून त्यांची चौकशी केली असता त्यांनी अनेक घरफोड्या केल्याच्या घटनांची कबुली दिली. सरधना पोलीस स्टेशनचे अधिकारी जितेंद्र सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांनी टेहरकी गावात निर्माणाधीन पाण्याच्या टाकीच्या लोखंडी सळ्या चोरल्याचं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अनुज, शाकीर, मोनू रहिवासी पाबली खास, मोनू, इरशाद रा. द्वारकापुरी कंकरखेडा, फिरोज रा. टेहरकी, शारूक अली रा. जितौली आणि अरमान रा. मोहम्मदपूर लोहड्डा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. अरमान हा प्रसिद्ध गायक फरमानी नाझचा भाऊ आणि इरशाद भावोजी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायक फरमानी नाझचे वडील आणि सख्खा भाऊ अरमान हे या गँगचे मुख्य सूत्रधार आहेत. अरमानचे वडील आरिफ आणि मेहुणा इरशाद हे देखील चोरीच्या घटनांमध्ये एकत्र राहत असत. पोलीस फरमानीच्या वडिलांचा शोध घेत आहेत. तसेच त्याच्या टोळीतील इतर सदस्यांची माहिती घेतल्यानंतर अटक करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी