शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

मूसेवालाची हत्या करणाऱ्या गॅंगस्टरचं राजस्थानच्या लेडी डॉनसोबत खास कनेक्शन, कोण आहे ती?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2022 15:10 IST

Goldy Brar connection with lady don Anuradha: आता गोल्डी बरारच्या राजस्थान कनेक्शनचा खुलासा झाला आहे. समोर आलं की, ती राजस्थानची लेडी डॉन अनुराधाचाही (Lady Don Anuradha) क्राइम पार्टनर होता.

Goldy Brar connection with lady don Anuradha: पंजाबमधील प्रसिद्ध गायक आणि कॉंग्रेस नेता सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) रविवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. नंतर या हत्येची जबाबदारी गॅंगस्टर गोल्डी बरारने घेतली होती. तो सध्या कॅनडात आहे आणि तिथूनच आपली गॅंग ऑपरेट करतो. आता गोल्डी बरारच्या राजस्थान कनेक्शनचा खुलासा झाला आहे. समोर आलं की, ती राजस्थानची लेडी डॉन अनुराधाचाही (Lady Don Anuradha) क्राइम पार्टनर होता.

कोण आहे लेडी डॉन अनुराधा?

अनुराधा (Don Anuradha) मूळची राजस्थानच्या सीकरची राहणारी आहे. अनुराधा बालपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिच्याकडे बीसीएची डिग्रीही आहे. अनुराधाचं लग्न दीपक मिन्ज नावाच्या तरूणासोबत झालं होतं आणि लग्नानंतर दोघांन शेअर ट्रेडिंगचं काम सुरू केलं होतं. मात्र, मोठं नुकसान झाल्यानं दोघेही कर्जबाजारी झाले होते. त्यानंतर अनुराधाने गुन्हे विश्वात पाउल ठेवलं आणि आपल्या पतीला सोडलं होतं.

आनंदपालसोबत जुळलं नाव

पतीला सोडल्यानंतर अनुराधा हिस्ट्रीशीटर बलबीर बानूडाच्या माध्यमातून राजस्थानचा कुख्यात गॅंगस्टर आनंदपालच्या संपर्कात आली. असं म्हटलं जातं की, दोघांमध्ये जवळचं नातं होतं. असं सांगितलं जातं की, अनुराधानेच आनंदपालचा पेहराव बदलला होता आणि त्याला इंग्रजी बोलणं शिकवलं होतं. तर आनंदपालने अनुराधाला एके-४७ चालवण्याचं ट्रेनिंग दिलं होतं.

नंतर बिश्नोई गॅंगसोबत जुळली

२०१७ मध्ये पोलिसांनी एका एन्काउंटरमध्ये आनंदपालला जीवे मारलं आणि त्यानंतर अनुराधाने लॉरेन्स बिश्नोईची गॅंग जॉइन केली. यादरम्यान काला जठेडी आणि गोल्डी बरार अनुराधाच्या संपर्कात आले होते. असं सांगितलं जातं की, अनुराधाने गोल्डीसोबत मिळून इंटरनॅशनल क्राइम सिंडिकेट तयार केला होता.

अनुराधाच्या गॅंगमध्ये गोल्डी बरार

३१ जुलै २०२१ ला जेव्हा अनुराधा आणि काला जठेडीला पकडण्यात आलं  तेव्हा समजलं होतं की, दोघांनी लग्न केलं आहे. दरम्यान पोलिसांनी खुलासा केला होता की, अनुराधाने गॅंगस्टर काला जठेडीसोबत मिळून आपल्या विरोधकांचा सफाया केला होता. अटकेनंतर अनुराधाने तिच्या गॅंगच्या सदस्यांची नावेही सांगितली होती. ज्यात गोल्डी बाबर याचंही नाव होतं. अनुराधा आता राजस्थानच्या अजमेर तुरूंगात कैदेत आहे. 

टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाCrime Newsगुन्हेगारी