शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवाला हत्याकांडात आणखी एका गुंडाची एन्ट्री, म्हणे... मारेकऱ्यांचा शोध घेणाऱ्यास ५ लाख देईन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2022 14:45 IST

Siddhu Moosewala : भुप्पी राणा म्हणाला की, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांना तो एक एक करून मारणार आहे.

चंदीगड : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणात आता आणखी एक गँगस्टर भुप्पी राणाची एन्ट्री झाली आहे. गँगस्टर भुप्पी राणाने सिद्धू मुसेवालाच्या मारेकऱ्यांचा पत्ता सांगणाऱ्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. मूसेवाल यांच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल, अशी पोस्ट भूपी राणाने फेसबुकवर केली आहे. भुप्पी राणा म्हणाला की, सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येला ज्यांनी पाठिंबा दिला आहे, त्यांना तो एक एक करून मारणार आहे.

भुप्पी राणा नीरज बवाना आणि बंबीहा गँगशी संबंधित आहे. भुप्पी राणा म्हणाला की, विक्की मिंडूखेडा यांच्या हत्येत सिद्धू मुसेवालाची कोणतीही भूमिका नाही. आपण जे काही करतो ते आपण स्वतः करतो. त्याचवेळी, सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील आरोपीला उत्तराखंड एसटीएफने अटक केली आहे.आरोपी यात्रेकरूंच्या गर्दीत सामील होऊन पोलिसांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना ही अटक जवळपास फिल्मी पद्धतीने झाली. अटक करण्यात आलेला हा आरोपी कुख्यात लॉरेन्स विश्नोई टोळीशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच उत्तराखंड पोलिसांनी अन्य पाच जणांना पंजाब पोलिसांच्या ताब्यात दिले.

प्रेयसीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी लॉरेन्स बनला गँगस्टर, करोडोंच्या मालमत्तेचा मालकत्याचवेळी सुरक्षा यंत्रणांशी संबंधित अधिकारी सांगतात की, ज्याप्रमाणे बॉलीवूडमध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी कंपनीचे वर्चस्व आहे, त्याचप्रमाणे पंजाब म्युझिक पंजाबचे गुंड पंजाब फिल्म इंडस्ट्रीमध्ये अस्तित्वासाठी स्पर्धा करत आहेत. हा ट्रेंड पूर्वी नगण्य होता, पण पंजाबमध्ये ज्याप्रकारे बंदूक संस्कृती वाढली आहे, क्वचितच असा पंजाबी गायक असेल की ज्याच्या गाण्यात बंदुक, रक्तपात याचा समावेश नसेल.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPunjabपंजाबmusicसंगीतPoliceपोलिस