शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शुक्रवार पेठ गोळीबार प्रकरण : मोहोळ व साथीदारांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 02:08 IST

शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन भाऊसाहेब मोहोळ (वय, २७ रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांना खडक पोलिसांनी गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथून अटक केली.

पुणे - शुक्रवार पेठेतील शिंदे आळीत भरदिवसा झालेल्या गोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन भाऊसाहेब मोहोळ (वय, २७ रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे) आणि त्याच्या दोन साथीदारांना खडक पोलिसांनी गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास खडकवासला येथून अटक केली.गोळीबारप्रकरणी मंदार धुमाळ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रुपेश चंद्रशेखर पाटील, नयन मोहोळ, निखिल बाबर, शुभम बाबर, संग्राम खामकर, लुकमान नदाफ, विशाल गुंड आणि त्यांच्या ४ ते ५ साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. रुपेश पाटील याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंदार धुमाळ, मंगेश धुमाळ, गणेश दारवटकर, अभिजित मोहिते, आकाश थापा व इतर ४ ते ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.गोळीबारात मंगेश धुमाळ (वय ३२, रा. शिंदे आळी, शुक्रवार पेठ) जखमी झाला होता. धुमाळ याच्या गटातील गणेश दारवटकर व मंदार धुमाळ हे किरकोळ जखमी झाले होते. तर रुपेश पाटील आणि विशाल गुंड हेही किरकोळ जखमी झाले होते. गोळीबार झाल्यानंतर पोलिसांनी शिंदे आळीमध्ये बंदोबस्त तैनात केला होता.काही काळ परिसरात तणावाचे वातावरण होते. दोन्ही गटातील एकूण १७ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी बहुसंख्य जणांना खडक पोलिसांनी अटक केली आहे.नयन मोहोळ याच्याविरोधात यापूर्वी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. ही कारवाई अपर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग रवींद्रसेनगावकर, परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त सुहास बाचवे, शहर सह पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, तपास पथकाचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस कर्मचारी सतीश नागुल, राकेश क्षीरसागर, संदीप पाटील, समीर माळवदकर, बंटी कांबळे, आशिष चव्हाण, सागर कोकण, इम्रान नदाफ, प्रमोद नेवसे यांच्या पथकाने केली.मुख्य आरोपी होता फरारगोळीबार प्रकरणातील मुख्य आरोपी नयन मोहोळ गोळीबार झाल्यापासून फरार होता. त्याचा शोध पोलीस घेत होते. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नयन मोहोळ खडकवासला भागात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार खडक पोलिसांनी त्याला मध्यरात्री अटक केली. त्यावेळी मोहोळबरोबर असणाऱ्या निखिल मुकुंद बाबर (वय २४ ) आणि शुभम गोरख बाबर (वय २३, दोघेही रा. हमालनगर, मार्केट यार्ड, पुणे) यांनाही अटक करण्यात आली. 

टॅग्स :ArrestअटकCrime Newsगुन्हेगारी