शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! पत्नी प्रसूतीसाठी माहेरी गेली; जळगावच्या गिरणा नदी पात्रात बुडून पतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2021 16:13 IST

निमखेडी शिवारातील घटना : पोहता येत नसल्याने गमावला जीव . शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता.

जळगाव : गिरणा नदी पात्रात बुडाल्याने शुभम उर्फ भवरलाल हिरालाल राजपूत (वय २६, रा.हिरा शिवा कॉलनी) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी ११ वाजता निमखेडी शिवारात घडली. शुभम याला पोहता येत नसल्यानेच त्याचा जीव गेल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, शुभमच्या मृत्यूची घटना समजताच शेकडोच्या संख्येने तरुणांनी रुग्णालयात धाव घेतली. मित्र व कुटुंबाचा प्रचंड आक्रोश सुरु होता.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,  शुभम हा शनिवारी मित्रांसोबत निमखेडी शिवारातील गिरणा नदीत गेलेला होता. तेथे काही लोक पाण्यात पोहत होते, शुभम याला पोहता येत नसल्याने तो पाण्यात जायला घाबरत होता. पाण्यात उतरल्यावर खोल खड‌्डयाचा अंदाज न आल्याने त्यातच तो बुडाला. शेजारी पोहणारे तरुण व सोबतच्या मित्रांनी त्याला पाण्यातून बाहेर काढून तातडीने शासकीय रुग्णालयात आणले. रस्त्यात त्याचा श्वास सुरु होता. रुग्णालयात डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषीत केले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर काही मिनिटातच शंभराच्यावर तरुणांनी रुग्णालय गाठले. अनेक मित्रांनी अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. कुटुंबातील महिलांचा तर प्रचंड आक्रोश सुरु होता.

जन्माला येण्याआधीच बाळाचे पितृछत्र हरपलेशुभम याचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. पत्नी प्रतिक्षा गरोदर असून माहेरी एरंडोल येथे गेलेली आहे. महिनाभरात ती प्रसुती होणार आहे. बाळाचा जन्म होण्याआधीच त्याचे पितृछत्र हरपले आहे. तर शुभम देखील बाळाचे तोंड बघू शकला नाही.  त्याच्या पश्चात पत्नी, आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. शुभम याचा वाळूचा व्यवसाय होता, असे रुग्णालयात आलेल्या त्याच्या मित्रांकडून सांगण्यात आले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव