जयपूर : श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या झाडून त्यांच्याच निवासस्थानी हत्या करण्यात आली. तीन मारेकऱ्यांनी सुरुवातीला सोफ्यावर बसून त्यांच्याशी गप्पा मारल्या आणि थोड्याच वेळात अचानक त्यांच्यावर गोळीबार केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. प्रत्युत्तरादाखल गोगामेडी यांच्या अंगरक्षकांनी केलेल्या गोळीबारात एक मारेकरी मारला गेला.
पलायनानंतरही गोळीबारगोगामेडी यांच्यावर हल्ला केल्यानंतर पळून जाताना एका कारचालकाला रोखण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर स्कूटीचालकावर गोळी झाडत त्याला जखमी केले आणि घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला आहे.
पद्मावत’ चित्रपटावेळी आले चर्चेतश्री राजपूत करणी सेनेचे अध्यक्ष लोकेंद्र सिंह कळवी यांच्यासोबतच्या मतभेदातून २०१५ मध्ये गोगामेडी यांनी श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची स्थापना केली. ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात त्यांनी विरोध प्रदर्शन केले होते.
रोहित गोदाराने घेतली जबाबदारीगोगामेडी यांच्या हत्येनंतर रोहित गोदारा गँगने फेसबुक पोस्ट करत घटनेची जबाबदारी स्वीकारली. ते आपल्या शत्रूंना मदत करत होते, असेही त्यांनी म्हटले आहे. त्याचा बदला आता घेत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.