शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

Shraddha Walker Murder Case: '18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे', श्रद्धा मर्डर केसच्या फॉरेन्सिक तपासात झाले धक्कादायक खुलासे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 19:08 IST

महत्वाचे म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला जवळपास 10 तास लागले होते, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे.

श्रद्धा मर्डर केसने संपूर्ण देश हादरला आहे. ही केस दिल्ली पोलिसांसाठी एक मोठे आव्हान बनली आहे. आरोपी आफताब अमीन पुनावालाने अद्याप चौकशीमध्ये म्हणावे तसे सहकार्य केलेले नाही. यामुळेच अद्याप पोलिसांना हत्याकांडात वापरलेला सुरा आणि श्रद्धाचा मोबाइल फोन मिळालेला नाही. पोलीसांनी बुधवारी आरोपीला ज्या फ्लॅटमध्ये हत्याकांड झाले त्या फ्लॅटमध्ये नेले होते. यातच यासंदर्भात फॉरेन्सिक टीमने बरीचशी महत्वपूर्ण माहिती दिली आहे.

फॉरेन्सिक टीमला लीड करणारे अधिकारी संजीव गुप्ता म्हणाले, फ्लॅटमध्ये केवळ एकाच ठीकाणी रक्ताचे अंश आढळून आले. संपूर्ण तपासादरम्यान केवळ किचनमध्येच रक्ताचे अंश मिळाले. चौकशीदरम्यान आफताबने सांगितले की, श्रद्धाच्या मृतदेहाचा एक तुकडा स्वयंपाकघरात ठेवला होता, तेथेच रक्ताचे अंश आढळून आले आहेत. फ्रीज असलेली रूम, बाथरूम सर्व स्वच्छ होते. हत्येला बरेच दिवस झाल्याने, अनेक वेळा क्लीनिंग झाली असेल. यामुळे रक्ताचे अंश मिळू शकले नाही. ते एका हिंदी वृत्त वाहिनीसोबत बोलत होते.

संबंधित अधिकाऱ्याने सांगितले, की श्रद्धाच्या रक्ताचे अंश शोधण्यासाठी केमिकलचा वापर करण्यात आला. आरोपी अफताबने बाथरूममध्ये श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते. तो जेव्हा तिच्या शरीराचे तुकडे करायचा, तेव्हा बाथरूममध्ये पाणीही सुरू करत होता. यामुळेही बाथरूममध्ये रक्ताचे अंश आढळून आले नाही. बाथरूममध्ये रक्ताचे अंश सापडण्याची शक्यता कमी असते. कारण तेथे नेहमीच पाण्याचा वापर होत असतो. आफताब एवढा हुशार होता, की ज्यावेळी त्याने प्रत्येक गोष्ट केमिकलच्या सहाय्याने साफ केली, तेव्हा बाथरूमही साफ केले असेल.

17-18 पॉलिथीनमध्ये ठेवले होते मृतदेहाचे तुकडे - फॉरेन्सिक टीमने दिलेल्या माहितीनुसार, मेहरौलीच्या नाल्यातून हाडे सापडली आहेत. श्रद्धाचा गळा बेडवर दाबण्यात आला गेला. मात्र तेथूनही काहीच सापडले नाही. आफताबच्या सांगण्यावरून मेहरौलीमध्ये हाडे सापडली आहेत. हाडांचा डीएनए मॅच झाला, तर ते श्रद्धाचेच असल्याचे स्पष्ट होईल. आरोपीने मृतदेहाचे तुकडे 17-18 पॉलिथिनमध्ये फ्रीजमध्ये  ठेवले होते. जेव्हा तपासणी केली, तेव्हा फ्रीजमध्ये काही अन्न होते, बाकी फ्रीज पूर्णपणे स्वच्छ होते. 

महत्वाचे म्हणजे, हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी आफताबला जवळपास 10 तास लागले होते, असेही त्याने चौकशी दरम्यान सांगितले आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरMaharashtraमहाराष्ट्रPoliceपोलिस