शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

श्रद्धाचे शीर कापून फ्रीजमध्ये ठेवले; दररोज फ्रीज उघडून तिचा चेहरा पाहायचा, चौकशीत खुलासा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2022 16:57 IST

महाराष्ट्रातील श्रद्धा नावाच्या तरुणीची दिल्लीत आफताब नावाच्या तरुणाने हत्या केली, या हत्याकांडाने देशात खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली:दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडात नवनवीन माहिती समोर येत आहे. आता समोर आलेल्या ताज्या माहितीनुसार, आरोपी आफताब अमीन पूनावालाने खून केल्यानंतर श्रद्धाचे शीर कापून फ्रीजमध्ये ठेवले होते. तसेच, तो दररोज श्रद्धाचा चेहरा पाहत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आफताब त्याच खोलीत झोपायचा, ज्या खोलीत त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे केले होते.

मृतदेहाचे 35 तुकडे केलेहत्येचा कट रचण्यासाठी आफताबने दिल्लीतील छतरपूर भागात भाड्याने घर घेतले होते का, याचा तपास दिल्ली पोलीस करत आहेत. सहा महिन्यांपूर्वी त्याने लिव्ह-इन गर्लफ्रेंड श्रद्धा वॉकरची हत्या आणि मृतदेहाचे 35 तुकडे केले होते. याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली असून, चौकशीदरम्यान तो नवनवीन खुलासे करत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब आणि श्रद्धा यांच्यात वारंवार भांडणे होत होती.

श्रद्धाची गळा दाबून हत्या केली पोलिस सूत्रांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितले की, आफताब आणि श्रद्धा एका डेटिंग अॅपद्वारे भेटले होते. ते दोघे 2019 पासून रिलेशनशिपमध्ये होते आणि या वर्षी दिल्लीत एकत्र राहायला आले होते. यापूर्वी दोघेही महाराष्ट्रात राहत होते. 18 मे रोजी छतरपूर येथील त्याच फ्लॅटमध्ये त्याने श्रद्धाची गळा दाबून हत्या केली होती. हत्येच्या काही दिवस आधी हे घर भाड्याने घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. हत्येनंतर त्याने श्रद्धाच्या मृतदेहाचे 35 तुकडे केले आणि दररोज पहाटे 2 वाजता, हे तुकडे विविध ठिकाणी फेकत होता.

घरातून पोलिसांनी काही हाडेही जप्त केली नोव्हेंबरमध्ये पालघर येथील रहिवासी असलेले श्रद्धाचे वडील विकास मदन वॉकर यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधला आणि मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान असे आढळून आले की आफताब आणि श्रद्धा दिल्लीतील छतरपूर पहाडी भागात भाड्याच्या घरात राहत आहेत. तपासादरम्यान पोलिसांनी आफताबचा शोध घेऊन त्याला अटक केली. चौकशीत आफताबने गुन्ह्याची कबुली दिली. लग्नासाठी श्रद्धाच्या दबावामुळे त्यांच्यात भांडण होत असे आणि यातूनच आफताबने श्रद्धाची हत्या केली. भाड्याच्या घरातून पोलिसांनी काही हाडेही जप्त केली असून, उर्वरित मृतदेह शोधण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीpalgharपालघरPoliceपोलिस