शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: श्रद्धाची हत्या मे की जुलै महिन्यात? पोलिस म्हणतात, मे महिन्यात, मित्र म्हणतो, जुलैमध्ये तिच्याशी संपर्क केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 07:03 IST

Shraddha Murder Case: ‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येऊ येत आहेत. श्रद्धा वालकरचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार याने आपले जुलैमध्ये श्रद्धाशी संभाषण झाले होते, असे म्हटले आहे.

नालासोपारा/नवी दिल्ली : ‘लिव्ह इन पार्टनर’च्या खुनामुळे देश हादरलेला असतानाच या प्रकरणात आता अनेक कंगोरे पुढे येऊ येत आहेत. श्रद्धा वालकरचा खून सहा महिन्यांपूर्वी मे महिन्यात झाला, असा पोलिसांचा दावा आहे. तर तिचा मित्र लक्ष्मण नाडार याने आपले जुलैमध्ये श्रद्धाशी संभाषण झाले होते, असे म्हटले आहे. त्यामुळे श्रद्धाचा खून नेमका कधी झाला, की आफताबने पोलिस आणि नाडारची दिशाभूल केली, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.नाडार याने दावा केला की, जुलैमध्ये श्रद्धाने त्याच्याशी व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधला तेव्हा ती खूप घाबरलेली होती. मला वाचवा नाहीतर तो मला मारून टाकील, असा मेसेज तिने केला होता. हे मी त्याच्या घरच्यांनाही सांगितले. नाडारने यापूर्वी काही मित्रांसोबत श्रद्धाला छतरपूरच्या घरातून सोडवले होते. श्रद्धाची आफताबशी असलेली बांधिलकी पाहून तिने पोलिसांत तक्रार केली नव्हती व ते पुन्हा एकत्र राहू लागले. श्रद्धासोबत जुलै महिन्यात बोलणे झाले, ऑगस्टपासून संपर्क झाला नाही, असे तिची मैत्रीण शिवानी म्हात्रे हिने पोलिसांना सांगितले आहे. तसेच कोणत्याही मेसेजचा रिप्लाय आला नसल्याचे नाडारने सांगितले. पोलिस म्हणाले की, आफताबने श्रद्धा जिवंत असल्याचे भासवण्यासाठी तिचे इन्स्टाग्राम अकाउंट वापरले. तिचा मोबाइल सापडलेला नाही. आरोपीने त्याचा वापर केला असावा. श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडारशी व्हॉट्सॲपवर चॅट केले असण्याची शक्यता आहे.

श्रद्धाच्या मृतदेहाचे १२ तुकडे सापडले श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे शोधता यावेत, यासाठी दिल्ली पोलिसांनी आफताबला मंगळवारी मेहरौलीच्या जंगलात नेले होते. पोलिसांना आतापर्यंत १२ तुकडे मिळाले आहेत. फॉरेन्सिक तपासणीनंतरच हे तुकडे श्रद्धाचे आहेत, की नाही याची पुष्टी होईल. गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेला चाकूही जप्त केला आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीVasai Virarवसई विरार