शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

श्रद्धा हत्याकांड : रागाच्या भरात श्रद्धाला मारले; आफताबची कोर्टात कबुली, पॉलिग्राफ चाचणीला परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 07:54 IST

हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले.  त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे. 

नवी दिल्ली : लिव्ह-इन-पार्टनर श्रद्धा वालकरची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याप्रकरणी आफताब अमीन पूनावाला याला दिल्ली कोर्टाने  मंगळवारी चार दिवसांची पोलीस कोठडी वाढवून देत त्याच्या पॉलिग्राफ चाचणीस परवानगी दिली. त्याने हा गुन्हा रागाच्या भरात केल्याची कबुली दिल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले. आफताबला महानगर दंडाधिकारी अविरल शुक्ला यांच्यासमोर व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे हजर करण्यात आले. आफताबला श्रद्धाचे अवयव शोधण्यासाठी दोन तलावांजवळ नेण्यात येणार आहे, त्यापैकी एक मेहरौलीच्या जंगलात आणि दुसरा येथील मैदानगढीमध्ये आहे. जेथे त्याने श्रद्धाचे अवयव फेकले अशा एका तलावाचे रेखाचित्रदेखील दिल्याची माहिती वकिलांनी दिली.हत्येनंतर मृतदेह कापण्यासाठी वापरलेले करवत व ब्लेड गुरुग्राममध्ये फेकून दिल्याचे सांगण्यात आले.  त्याचा शोध पुन्हा घेतला जाणार आहे. 

चार दिवसांची कोठडीपोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, तपास अद्याप सुरू असल्याने त्याच्या पोलिस कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. आरोपीला आणखी चार दिवसांची पोलिस कोठडी दिली. त्यामुळे अधिक पुरावे गोळा करण्यास मदत होईल. 

सीबीआय तपासाची याचिका फेटाळलीहे प्रकरण दिल्ली पोलिसांकडून सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी जनहित याचिका कोर्टाने फेटाळली. कोर्टाने आदेश देताना याचिकाकर्त्यावर दंडही  आकारला आहे. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय