शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case : चेहऱ्यावर जखमा, तीन दिवस रुग्णालयात उपचार; श्रद्धाचा नवा फोटो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 12:52 IST

मुंबईची श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे.

मुंबईची श्रद्धा वालकर हत्याकांडात रोज नवीन खुलासे होत आहे. दिल्ली पोलिसांनी पुरावे गोळा करण्यासाठी तपास सुरू केला आहे. आफताबने श्रद्धाचा मृतदेह ठेवण्यासाठी फ्रीजचा वापर केला होता. आता दिल्ली पोलीस आफताबची चौकशी करण्यासाठी नार्को टेस्ट करणार आहे. आज श्रध्दाचा एक नवा फोटो समोर आला आहे. या फोटोत श्रध्दा जखमी असल्याचे दिसत आहे. 

हा फोटो 2020 मधील आहे, यावेळी आफताबने श्रद्धाला मारहाण केली होती. यानंतर श्रद्धाला 3 दिवस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असा आरोप श्रद्धाच्या मित्रांनी केला आहे. या फोटोत श्रद्धाच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. इतके दिवस श्रद्धाने आफताबचा अत्यार तिने का सहन केला असा सवाल आता तिचे मित्र करत आहेत. 

 क्रूरकर्मा आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत...

श्रद्धा खून प्रकरणाचा तपास दिल्ली ते मुंबईपर्यंत सुरू आहे. दरम्यान, मुंबईत भाड्याने फ्लॅट घेताना आफताब आणि श्रद्धा यांनी स्वत:ला पती-पत्नी असल्याचे सांगून भाडे करार केल्याचे समोर आले आहे. फ्लॅट मालकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये खूप भांडण व्हायचे, दोघेही बिल्डिंगखाली भांडायचे. आफताब आणि श्रद्धा यांच्यात झालेल्या भांडणाची माहिती शेजाऱ्यांना झाली होती.

आफताबला ना खेद ना खंत, लॉकअपमध्ये शांत...

श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपी आफताब अमीन पूनावाला अजूनही पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहे. आफताबचा खोटेपणा सतत समोर येत आहे. त्याने इतक्या धूर्तपणे खून केला आहे की, तो न्यायालयात सिद्ध करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा अजिबात पश्चात्ताप नाही. तो लॉकअपमध्ये शांतपणे झोपतो. 

 श्रद्धाची हत्या केल्यानंतर त्याने शीर जाळण्याचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले. हत्येनंतर बाहेरून खाद्यपदार्थ मागवून त्याने मृतदेहाशेजारीच ते खाल्ले; शिवाय तो अधूनमधून श्रद्धाच्या शिराला मेकअपही करायचा, असेही चौकशीत पुढे आले आहे. 

आफताबची कबुली

आफताबने जेथून फ्रिज विकत घेतले, त्या दुकानमालकाचा जबाब आणि बिल.जंगलात सापडलेले अवयव आणि किचनमध्ये सापडलेले रक्त.आफताबने श्रद्धाच्या बँक खात्यातून ५४ हजार रुपये काढल्याचा तपशील.

मृतदेहाची खांडोळी अन्  वेब सीरिज पाहिलीश्रद्धा वालकरच्या मृतदेहाची खांडोळी करायला आरोपी आफताब पूनावाला याला सुमारे १० तास लागले. काम संपवून त्याने बीअर आणली, मग नेटफ्लिक्सवर वेब सीरिज पाहिली आणि झोपी गेला.

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी