शहरं
Join us  
Trending Stories
1
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
2
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
3
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
4
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
5
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
6
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
7
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
8
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
9
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
10
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
11
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
12
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
13
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
14
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
15
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
16
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
17
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
18
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
19
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
20
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

Shraddha Murder Case: आफताबने ५४ हजार काढले आणि अडकला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 11:25 IST

Shraddha Murder Case: आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये काढले आणि श्रद्धा बेपत्ता असतानाही पैसे कसे काढले, याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला

नालासोपारा : वसईच्या माणिकपूर परिसरात राहणाऱ्या श्रद्धा वालकर (२७) हिची दिल्ली येथे तिचा प्रियकर आफताब (२८) याने गळा दाबून हत्या केल्यावर शरीराचे ३५ तुकडे केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत. आरोपी आफताब याने श्रद्धाच्या बँक खात्यामधून ५४ हजार रुपये काढले आणि श्रद्धा बेपत्ता असतानाही पैसे कसे काढले, याचा तपास करणाऱ्या पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. आरोपी आफताब याने ही रक्कम कधी व कुठे काढली याचा तपास आता पोलिस करीत आहेत. त्याने श्रद्धाची हत्या ही दुसऱ्या तरुणीसोबत असलेल्या प्रेमप्रकरणामुळे केल्याचेही समोर येत आहे. आफताब हा दुसऱ्या तरुणीसोबत  चॅटिंग करायचा. त्याला श्रद्धाने विरोध दर्शविल्याने आरोपीच्या डोक्यात राग होता. त्यातूनच त्याने हे  कृत्य केल्याचे  बोलले जात आहे. 

आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला फाशीश्रद्धाची निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी आफताबच्या प्रतीकात्मक पुतळ्याला वसईत फाशी देण्यात आली आहे. बुधवारी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास फाशी दिलेला पुतळा अंबाडी ब्रिजखाली लावण्यात आला होता.माणिकपूर पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचून तो पुतळा जप्त केला. हा पुतळा नेमका कोणी लावला याची माहिती नसून त्याचा शोध घेत असल्याचे माणिकपूरचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. 

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी