शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जम्मूत श्रद्धासारखे हत्याकांड...डॉक्टर सुमेधा शर्माचा चाकू भोसकून खून; बॉयफ्रेंड महमूदविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 14:07 IST

होळीनिमित्त तरुणी बॉयफ्रेंडला भेटायला घरी गेली, तिथे त्याने चाकू भोसकला.

Jammu Kashmir Crime News : जम्मूमधून हत्येची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिला डॉक्टरची तिच्याच प्रियकराने चाकू भोसकून हत्या केली. विशेष म्हणजे, तरुणाने प्रेयसीची हत्या केल्यानंतर स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत जखमी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासोबतच तपास सुरू करण्यात आला आहे.

तलब टिल्लो (जम्मू) येथील डॉ. सुमेधा शर्मा आणि दोडा जिल्ह्यातील भदेरवाह येथील महमूद गनई यांचे एकमेकांवर प्रेम होते. महमूद आणि सुमेधा एकाच कॉलेजमध्ये शिकायला होते. दोघांनी जम्मूमधील डेंटल कॉलेजमधून बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी (बीडीएस) केले. सध्या सुमेधा जम्मू-काश्मीरच्या बाहेरील कॉलेजमधून एमडीएस करत होती.

सुमेधा होळीच्या सुट्टीसाठी जम्मूमध्ये आली होती. यादरम्यान 7 मार्च रोजी ती जानीपूर येथे महमूदच्या घरी भेटायल गेली. तिथे त्यांच्यात काही कारणावरुन भांडण झाले, यादरम्यान महमूदने सुमेधाची चाकूने भोसकून हत्या केली आणि नंतर त्याच चाकूने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलीस महमूदच्या घरी गेले. पोलिसांना सुमेधा यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला, तर आरोपीच्या पोटातही गंभीर जखमेच्या खुणा दिसल्या. पोलिसांनी दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल केले.

कायदेशीर औपचारिकता पूर्ण करुन पोलिसांनी महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. आरोपीची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जम्मूच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी भादंवि कलम 302 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. सध्या या प्रकरणाबाबत आरोपी आणि मृत तरुणीचे नातेवाईक मौन बाळगून आहेत.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूShraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकर