शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Shraddha Murder Case: "आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा कारण...."; शेजाऱ्यांचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 14:14 IST

Shraddha Murder Case: हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबच्या शेजाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे.

दिल्लीतील महरौली येथील फ्लॅटमध्ये 28 वर्षीय आफताब पूनावाला याने 18 मे रोजी त्याची लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वालकरची निर्घृणपणे हत्या केली. या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे करण्यात येत आहेत. आता पुन्हा एकदा अशीच धक्कादायक माहिती समोर आली आहे. आफताबच्या शेजाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. आफताब रात्री अचानक पाण्याचा पंप सुरू करायचा असं म्हटलं आहे. आफताबने श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर मृतदेहाचे 35 तुकडे केले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आफताब अतिशय हुशार आहे. तो चौकशीत प्रश्नांची उत्तर इंग्रजीत देतो. मात्र त्याला हिंदीही उत्तम बोलता येतं. श्रद्धा राहत असलेल्या घरात असलेला पाण्याचा पंप रात्री उशिरा सुरू व्हायचा, असं त्यांच्या शेजाऱ्यांपैकी काहींनी सांगितलं. याबद्दलची अधिक माहिती पोलिसांनी दिली. आफताब रात्री उशीरा श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे करायचा. त्यावेळी होणारा आवाज कोणालाही ऐकू येऊ नये यासाठी पाण्याचा पंप सुरू करायचा असं पोलिसांनी सांगितलं.

आफताब जास्त लोकांशी बोलायचा नाही. संध्याकाळी घरी यायचा आणि नेहमीच ऑनलाईन फूड डिलेव्हरी एपच्या माध्यमातून जेवण मागवायचा अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली. श्रद्धाचा गळा आवळून खून केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आफताब जवळच्या बाजारात गेला. तिथून त्याने एक 300 लीटरचा फ्रीज खरेदी केला. त्यासाठी त्याने क्रेडिट कार्डने 23,500 रुपये दिले. तसेच त्याने चाकू आणि कचरा टाकण्यासाठी असलेल्या पिशव्या विकत घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीएनएन-न्यूज18 ने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

श्रद्धाचे 35 तुकडे करणारा 'तो' शांतपणे झोपला; आफताबचा जेलमधील Video व्हायरल

आफताबचा जेलमधील एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. आफताब जेलमध्ये असून त्याला काही दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यात दरम्यान त्याचा जेलमधील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये आफताब जमिनीवर शांतपणे झोपलेला पाहायला मिळत आहे. पोलिसांनी हत्या प्रकरणात आफताबची चौकशी केली असता त्याच्या बोलण्यात कोणताच खेद जाणवला नाही. त्याला या गोष्टीचा पश्चाताप देखील नसल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी अटक केल्यावर आफताब एकदाच रडला. आफताबचे वडील अमीन पुनावाला कोठडीत त्याची भेट घेण्यासाठी आले होते. त्यावेळी आफताबच्या डोळ्यात अश्रू होते अशी माहिती समोर आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Shraddha Walker Murder Caseश्रद्धा वालकरCrime Newsगुन्हेगारी