पोलिसाला कोयता दाखविला; उल्हासनगरात गावगुंडाला अटक करून आणले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2022 19:58 IST2022-04-20T19:58:44+5:302022-04-20T19:58:50+5:30
उल्हासनगरात पोलिसांनी गुंडाची दहशत काढली मोडून

पोलिसाला कोयता दाखविला; उल्हासनगरात गावगुंडाला अटक करून आणले...
सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-३ शांतीनगर येथील विमल कार झोन दुकानासमोर पायावरून कार गेल्याचा बहाणा एका इसमाला मारहाण करून मदतीसाठी धावून आलेल्या पोलिसाला कोयता दाखविणाऱ्या दोन गावगुंडाला पोलिसांनी जेरबंद केले. तसेच बुधवारी सकाळी गुन्ह्याची प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी अटक गावगुंडाला आणून त्यांची दहशत मोडून काढण्याचा पर्यन्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी केली.
उल्हासनगर कॅम्प नं-३ शांतीनगर परिसरातील विमल कार झोन दुकाना समोर गाडी पार्किंग करणाऱ्या एका ग्राहकाला दोन गावगुंडांनी पायावरून गाडीचे चाक गेले. असे कारण सांगत शस्त्राचा धाक दाखवून मारहाण केली. तसेच मदतीसाठी धावलेले मध्यवर्ती पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलिस पवार यांच्यावर कोयता घेऊन मारण्यास धावला. या सर्व प्रकार दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. मंगळवारी रात्री अरविंद गवळी व कासीम अली या दोन गावगुंडांवर गुन्हे दाखल होऊन रात्रीच त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांची शांतीनगर परिसरातील दहशद मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी घडलेल्या घटनेच्या जागी त्यांना नेऊन प्रात्यक्षिक करण्यास लावले. हा सर्व प्रकार असंख्य नागरिक पाहत होते. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्ह्या दाखल झाल्यावर पोलिसांनी बुधवारी अरविद गवळे व कासीम अली याना अटक करण्यात आली. अधिक तपास मध्यवर्ती पोलीस करीत आहेत.