शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

क्षुल्लक कारणावरून गोळीबार, तरुण गंभीर जखमी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 01:38 IST

अहुजानगर हुडको कॉलनी येथील रहिवासी पलाश राजू पाटील रविवारी रात्री मिसाळ लेआउट मधून इको कारने घराकडे येत होता.

नागपूर : रस्त्यावर दुचाकी लावून गप्पा करणाऱ्या तरुणांना हटकले म्हणून त्यांनी कार चालकाचा पाठलाग करून त्याच्या घरी गोळीबार केला. यात प्रितेश राजू पाटील (वय २६) नामक तरुण गंभीर जखमी झाला. जरीपटक्यात रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.

अहुजानगर हुडको कॉलनी येथील रहिवासी पलाश राजू पाटील रविवारी रात्री मिसाळ लेआउट मधून इको कारने घराकडे येत होता. रस्त्यात दहा ते पंधरा तरून दुचाकी रस्त्यावर लावून दंगामस्ती करत होते. पाटीलने त्यांना दुचाक्या बाजूला घ्या, असे म्हटले. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. बाचाबाचीनंतर आरोपी आक्रमक झाल्याचे पाहून पाटीलने आपल्या घराचा मार्ग धरला. मात्र आरोपींनी त्याचा पाठलाग करून हुडको कॉलनी गाठली. आरोपींनी आरडाओरड करीत पाटीलला शिवीगाळ केली. ती ऐकून पलाशचा भाऊ प्रितेश समोर आला. त्याने आरोपींना जाब विचारताच एकाने पिस्तुलातून दोन ते तीन गोळ्या झाडल्या. त्यातील एक गोळी प्रीतेशच्या पोटाला चाटून केली. त्यामुळे तो जबर जखमी झाला. आरोपींनी तलवारीने दुचाकीच्या हेडलाईटवर फटका मारला आणि तोडफोड केली.

या घटनेमुळे परिसरात प्रचंड दहशत निर्माण झाली. आरोपी आरडाओरड करून शिवीगाळ करत होते. प्रसंगावधान राखून एकाने पोलीस नियंत्रण कक्षात फोन केला. त्यानंतर पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी पळून गेले. जखमी रितेशला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेनंतर मोठा जमाव जरीपटका पोलीस ठाण्यात पोहोचला. रात्री १ वाजेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

पोलीस ताफा धावलाजरीटक्यात फायरिंग झाल्याची माहिती कळताच आजूबाजूच्या भागात गस्त करणारे पोलीस पथके तसेच गुन्हे शाखेचाही ताफा घटनास्थळी धावला. काही पोलीस अधिकाऱ्यांनी मेयोत धाव घेतली. हल्ला करणाऱ्यांपैकी एकाचे नाव उमेश ठाकरे असल्याचे सांगितले जात होते. वृत्तलिहिस्तोवर आरोपींना शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरू होती. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी