शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

मुख्याध्यापकावर गोळीबार : सहायक शिक्षकाने रचला कट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 19:30 IST

या प्रकरणात सहायक शिक्षकासह आणखी एका आरोपीला अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे.

मालेगाव : अमानी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकावर गोळीबार करण्याचा कट रचून शस्त्र खरेदीसाठी सहायक शिक्षक गजानन महादेव इंगळे याने शस्त्र खरेदीसाठीही ४० हजार रुपये दिल्याची कबुली या घटनेतील मुख्य आरोपी सुशांत खंडारे याने पोलीस चौकशीदरम्यान २५ जुलै रोजी दिली. दरम्यान, या प्रकरणात सहायक शिक्षकासह आणखी एका आरोपीला अटक केल्याने या प्रकरणातील आरोपींची एकूण संख्या तीन झाली आहे.केंद्रप्रमुख चंद्रकांत कानडे, अमानी जि.प. शाळेचे मुख्याध्यापक विजय बोरकर, तत्कालिन मुख्याध्यापक गजानन इंगळे हे अन्य शिक्षकांसह अमानी जिल्हा परिषद शाळेत २४ जुलै रोजी नेहमीप्रमाणे बसलेले असताना, सकाळी १०:३० च्या सुमारास  आरोपी सुशांत समाधान खंडारे या युवकाने मुख्याध्यापकाच्या कार्यालयात प्रवेश करीत मुख्याध्यापक विजय बोरकर यांच्या दिशेने पिस्तुलमधून गोळी झाडली. सुदैवाने हा हल्ल्यातून बोरकर बचावले. याप्रकरणी २४ जुलै रोजीच आरोपी सुशांत खंडारे याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता, गोळीबार प्रकरणाचा उलगडा झाला. आरोपी खंडारे याने पोलीस चौकशीदरम्यान दिलेल्या कबुलीनुसार, सहायक शिक्षक इंगळे हे याअगोदर अमानी येथेच मुख्याध्यापक म्हणुन काम पाहत होते. कालांतराने त्यांचेकडील मुख्याध्यापक पदाचा प्रभार काढल्याने ते सहकारी शिक्षकांवर नाराज होते.  मुख्याध्यापकाला मारण्याकरीता शस्त्र खरेदीसाठी ४० हजार रुपयेही दिले. या प्रकरणात कैलास आत्माराम बनसोड ह.मु. मालेगाव (४५) यानेही मुख्याध्यापकाला मारण्यासाठी चिथावणी  दिले, तुरूंगातून तुला सोडवून आणण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करतो, असेही बनसोड याने सांगितले, अशी कबूली आरोपी इंगळे यांनी दिल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. मुख्याध्यापकाला मारण्याचा कट रचल्यानंतर घटनेच्या दोन, तीन दिवसापूर्वीपासून गोळी झाडण्यासाठी संधीची वाट पाहत होतो आणि संधी मिळताच २४ जुलै रोजी गोळी झाडली, असे आरोपीने सांगितले.सहायक शिक्षक गजानन महादेव इंगळे व कैलास आत्माराम बनसोड दोन्ही रा.मालेगाव यांनी आरोपी सुशांत खंडारे यास हाताशी धरुन मुख्याध्यापक विजय बोरकर यांना जिवाने मारण्याचा कट रचला, असे तपासाअंती उघड होत असल्याने उपरोक्त दोन्ही आरोपीला २५ जुलै रोजी मालेगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. शनिवारी त्यांचेवर भादंवी कलम ३०७ (४), २५ आर्म अ‍ॅक्ट व सह कलम १२० ब नुसार गुन्हा दाखल केला. त्यांना न्यायालयात हजर केले असता २८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार आधारसिंग सोनोने करीत आहेत. दुसरे पिस्तुल जप्तगोळी झाडणारा आरोपी हा मुंबई येथे वास्तव्य करीत होता. कोरोनामुळे तो गावी आला. त्याच्याकडे तीन पिस्तुल असल्याची चर्चा असून, २५ जुलै रोजी दुसरे पिस्तुल जप्त करण्यात आले. गोळीबार प्रकरण नेमके कोणते वळण घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :washimवाशिमCrime Newsगुन्हेगारी