Shocking! youngster died by drowning in the sea | धक्कादायक!समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू
धक्कादायक!समुद्रात बुडून तरुणाचा मृत्यू

नालासोपारा - वसई गावातील सुरुची बाग येथील समुद्रामध्ये भाईंदर येथे राहणारा दिनेश मनोहर परिहार हा 31 वर्षीय तरुण बुधवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक अमोल गर्जे यांनी सांगितले की, परिहारचा समुद्रात बुडल्याने मृत्यू झाला असून तो मागील तीन दिवसांपासून गायब असल्याने त्यांच्या लहान भावाने भाईंदर पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दिली होती. परिहार याच्या खिशातून मोबाईल मिळाल्यानंतर मोबाईल नंबर वरून त्याची ओळख पटली आहे.


Web Title: Shocking! youngster died by drowning in the sea
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.