शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! गूळ समजून फोडला बॉम्ब, स्फोटानंतर महिलेचे झाले असे हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2023 11:20 IST

हा बॉम्ब कुठून आला? यासंदर्भात महिलेच्या पतीची चौकशी केली जात आहे.

बिहारमधील बक्सर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका महिलेचा निष्काळजीपणा तिच्याच अंगलट आला. या महिलेने गुळाची भेली समजून बॉम्ब जमिनीवर फेकला. यानंतर मोठा स्फोट झाला आणि महिला गंभीर रित्या जखमी झाली. या स्फोटाचा आवाज एवढा मोठा होता की, तो ऐकून महिलेच्या कुटुंबीयांसह आजूबाजूच्या लोकांनाही धक्का बसला. संबंधित महिलेला गंभीर अवस्थेत उपचारासाठी वाराणसीला रेफर करण्यात आले आहे.

ही घटना बक्सरच्या इटाढी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाला देवा गावात घडली. येथील रामनाथ राम यांच्या घरी एक बॉम्ब ठेवण्यात आला होता. रामनाथ यांची पत्नी शांती शनिवारी सकाळच्या सुमारास या बॉम्बला गुळाची भेली समजून गच्चीवर घेऊन गेली आणि तो तोडू लागली. मात्र याच वेळी त्यात स्फोट झाला. या बॉम्बच्या आवाजाने संपूर्ण घर हादरले. 

या स्फोटाचा आवाज ऐकून संबंधित महिलेचे कुटुंबीय आणि शेजारील लोक गच्चीवर पोहोचले. यावेळी शांती गंभीर अवस्थेत तेथे पडलेली होती. यानंतर, पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली आणि शांतीला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र येथे शांतीची प्रकृती पाहता तिला वाराणसीला रेफर करण्यात आले आहे.

यासंदर्भात माहिती देताना बक्सर एसपी मनीष कुमार म्हणाले, प्रकरण गंभीर असल्याने बॉम्बशोधक पथक आणि एफएसएल टीमलाही घटनास्थळी पाठवण्यात आले होते. हा बॉम्ब कुठून आला? यासंदर्भात महिलेच्या पतीची चौकशी केली जात आहे. याशिवाय शेजारच्या लोकांनाही विचारपूस करण्यात आली आहे. यासंदर्भात शोध सुरू आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहारBlastस्फोटPoliceपोलिसWomenमहिला