शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आईनेच मुलीला एक लाखात गोव्यात विकले

By उद्धव गोडसे | Updated: April 17, 2024 13:46 IST

पट्टणकोडोली येथील महिलेसह तिघांना अटक, पाच जणांवर गुन्हा दाखल

कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पतीपासून वेगळे राहणा-या महिलेने मित्राच्या मदतीने तिची एक वर्षाची मुलगी गोव्यातील दाम्पत्याला एक लाखात विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुलीचे वडील दिलीप विलास ढेंगे (वय ३०, रा. इंगळी, ता. हातकणंगले) यांनी बुधवारी (दि. १७) पहाटे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, पाच जणांवर गुन्हा दाखल झाला. यातील महिलेसह तिचा मित्र आणि मुलगी विकण्यासाठी मध्यस्थी करणा-या संशयितास पोलिसांनी अटक केली.

मुलीची आई पूनम दिलीप ढेंगे (वय २५, मूळ रा. इंगळी, सध्या रा. पट्टणकोडोली, ता. हातकणंगले), तिचा मित्र सचिन आण्णाप्पा कोंडेकर (वय ४०, रा. शहापूर, इचलकरंजी), मध्यस्थी करणारा किरण गणपती पाटील (वय ३०, रा. केर्ली, ता. करवीर) आणि गोव्यातील दाम्पत्य फातिमा फर्नांडिस व जेरी पॉल नो-होन्हा यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

लक्ष्मीपुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी दिलीप आणि पूनम यांचे २०१८ मध्ये लग्न झाले. त्यांना तीन वर्षाचा एक मुलगा आणि एक वर्षाची मुलगी आहे. कौटुंबिक वादामुळे गेल्या वर्षभरापासून पूनम ही पट्टणकोडोली येथे तिच्या आईकडे राहते. १३ एप्रिल रोजी फिर्यादी दिलीप यांना त्यांच्या सासूचा फोन आला. पूनम हिने लहान मुलगी कोणालातरी दत्तक दिली असून, तुम्ही येऊन चौकशी करा, असे त्यांनी सांगितले. त्यानुसार दिलीप यांनी पट्टणकोडोली येथे जाऊन चौकशी केली असता, सध्या पत्नी पूनम इचलकरंजीत सचिन कोंडेकर या मित्राकडे राहत असल्याचे समजले. तिथे जाऊन चौकशी केली असता, तिने मुलीला आष्टा (जि. सांगली) येथील पाळणाघरात ठेवल्याचे सांगितले. तिला आत्ताच्याआत्ता भेटायचे असल्याचा आग्रह धरल्यामुळे अखेर तिने मुलीला गोव्यातील दाम्पत्याकडे विकल्याचे सांगितले. ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरी केल्याचेही तिने दाखवले.

हुपरी पोलिसांनी लक्ष्मीपुरीत पाठवलेमुलीची विक्री झाल्याचा प्रकार लक्षात येताच दिलीप याने हुपरी पोलिस ठाण्यात धाव घेतली. मात्र, लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत करवीर तहसीलदार कार्यालयाच्या आवारात नोटरी झाल्याने पोलिसांनी ढेंगे यांना लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात जाण्याचा सल्ला दिला. ढेंगे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल करून तातडीने तिघांना अटक केली. सहायक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर