धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

By सोमनाथ खताळ | Published: July 10, 2024 10:27 PM2024-07-10T22:27:36+5:302024-07-10T22:34:14+5:30

पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला प्रकार

Shocking! The family went to Dhule for a wedding, here in Beed the thieves cleared the house | धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

धक्कादायक! कुटुंब धुळ्याला लग्नाला गेले, इकडे बीडमध्ये चोरट्यांनी घर साफ केले

सोमनाथ खताळ, बीड: नातेवाइकाच्या लग्नासाठी बीडमधील कुटुंब धुळ्याला गेले होते. दोन दिवसांनी परतल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे दिसले. हा प्रकार १० जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

बीड शहरातील गयानगर भागातील संस्कार कॉलनीत ज्ञानेश्वर विष्णूपंत आनेराव (वय ४१) यांचे घर आहे. ८ जुलै रोजी ते पत्नी, मुलगा व मुलगी यांच्यासमवेत धुळे येथे लग्न समारंभासाठी गेले होते. तेथील कार्यक्रम आटोपल्यानंतर १० जुलै रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास ते बीडमध्य परतले. यावेळी त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यांची पत्नी दीपा आनेराव यांनी घरात जाऊन पाहिले असता, बेडरुममधील दोन्ही कपाटाचे दरवाजे तुटलेले दिसले. त्यातील सर्व सामान अस्ताव्यस्त आढळले. लॉकर उघडून पाहिल्यानंतर त्यातील सोन्याची बोरमाळ, कानातील झुंबरजोड, पिळ्याची अंगठी व रोख १४ हजार रुपये असा ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास झाल्याचे दिसून आले.

आनेराव यांनी तातडीने पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी पंचनामा केला. त्यानंत शिवाजीनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणाची नोंद झाली आहे. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Shocking! The family went to Dhule for a wedding, here in Beed the thieves cleared the house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Robberyचोरी