शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक; सावत्र बापाचा १५ वर्षीय मुलीवर अतिप्रसंग, आरोपीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 13:48 IST

वरूड तालुक्यातील घटना : आरोपी अटक

अमरावती: सावत्र बापाने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना वरूड तालुक्यात घडली. याप्रकरणी ७ जानेवारी रोजी रात्री ८ च्या सुमारास वरूड पोलिसांनी २८ वर्षीय आरोपीविरूध्द बलात्कार व पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली असून, त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले.             तक्रारीनुसार, १५ वर्षीय अल्पवयीन मुलीची ३५ वर्षीय आई तिच्या मोठ्या मुलीच्या अर्थात पिडिताच्या मोठ्या बहिणीच्या प्रसुतीसाठी बाहेरगावी गेली होती. तर पिडिता ही सावत्र बापाच्या घरी एकटीच होती. दरम्यान, १ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९ च्या सुमारास ती मुलगी घरातील कामे आटोपून हॉलमध्ये बसली असताना आरोपी सावत्र बाप तेथे आला. तिला धमकी देत त्याने तिच्यावर अतिप्रसंग केला. याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. आरोपीने १ डिसेंबर २०२२ ते ६ जानेवारी रोजीपर्यंत त्याने तिच्यावर वारंवार अतिप्रसंग केला. दरम्यान, आई परत आल्यानंतर तिने ही बाब तिला सांगितली. अखेर तिने ७ जानेवारी रोजी सायंकाळी वरूड पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तेथे महिला पोलीस अधिकाऱ्यांनी तिची आपबिती ऐकून तक्रार दाखल करवून घेतली. वरूड पोलिसांनी तातडीने सुत्रे हलवत आरोपीला शनिवारी रात्रीच अटक केली.

आरोपीला न्यायालयात नेले - बागडे

पिडिताची आई तिच्या मोठया मुलीच्या प्रसुतीसाठी बाहेरगावी गेली होती. त्याचा गैरफायदा घेत सावत्रबापाने आपल्यावर अतिप्रसंग केल्याचे पिडिताने तक्रारीत म्हटले आहे. आरोपीला अटक करण्यात आली. त्याला रविवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.सारिका बागडे, सहायक पोलीस निरिक्षक,वरूड पोलीस ठाणे

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसAmravatiअमरावती