शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 21:51 IST

या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल

ठळक मुद्दे आजीला संशय आल्याने आजीने तिला याबाबत खोदून विचारले. पोलिसांनी विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४), अजय दोहारे (३४) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.

कल्याण - कल्याण पश्चिमेकडील परिसरात खळबळजनक घटना घडली आहे. सात वर्षाच्या चिमुकलीवर तीन नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस स्थानकात दाखल तक्रारीनुसार पोलिसांनी विक्रम पुरोहित (१९), नवीन जसुजा (२४), अजय दोहारे (३४) यांच्याविरोधात गुन्हे दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.पिडीत मुलगी पहिलीच्या वर्गात शिकते. पालकांनी या मुलीला शाळेत सोडण्यासाठी आणि परत आणण्यासाठी रिक्षा ठरवून दिली होती.शाळा सुटल्यानंतर ही चिमुरडी शाळेबाहेर रिक्षाची वाट पाहत थांबायची हीच संधी साधत शाळेसमोर दुकाने थाटून बसलेल्या विक्रम, नवीन आणि अजय यांनी या चिमुरडीची ओळख काढत तिला खाऊ देण्याचे आमिष दाखवत शाळेसमोर असलेल्या मोडकळीस आलेल्या रिकाम्या इमारतीत नेऊन तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार करत असत रिक्षाचालक तिला परत नेण्यासाठी येण्यापूर्वीच ते तिला परत शाळेबाहेर आणून सोडत असल्यामुळे हा प्रकार कोणाच्या लक्षात आला नाही. हीच संधी साधत नराधम आरोप मागील अनेक महिन्यापासून या चिमुरडीवर वारंवार सामूहिक अत्याचार करत होते. मात्र, या चिमुरडीच्या वागण्यात अचानक बदल दिसू लागल्याने आजीला संशय आल्याने आजीने तिला याबाबत खोदून विचारले. त्यावेळी तिने आपल्यावर झालेल्या अत्याचाराबाबत सांगितले. नंतर पीडित चिमुरडीच्या पालकांनी या तीन नराधमांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉक्सो कायद्याअंतर्गत या तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळPOCSO Actपॉक्सो कायदाArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याण