शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! विद्यापीठांच्या गुणपत्रिकांची २ ते १५ हजारांत विक्री 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 07:43 IST

गुन्हे शाखेने केला पर्दाफाश, दुकलीला अटक : बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मुंबई : भारतातील विविध शैक्षणिक मंडळे आणि विद्यापीठांच्या गुणपत्रिका, प्रमाणपत्रांची २ ते १५ हजार रुपयांत विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार गुन्हे शाखेच्या कारवाईतून उघड झाला आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने मुनावर अहमद सय्यद (३४) आणि हासमुद्दीन खैरुद्दीन शहा (३३) या दुकलीला अटक केली आहे.       गुन्हे शाखेच्या कक्ष २ ला या टोळीबाबत समजताच, प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय निकुंबे, तपास अधिकारी मिलिंद काठे, संतोष साळुंखे, गुंडेवाड, राणे, पटेल आणि अंमलदार यांनी तपास सुरू केला. एका बनावट ग्राहकाच्या मदतीने पथकाने सय्यदशी भेट घेतली. त्यानुसार आरोपीने दहावी, बारावी उत्तीर्ण झालेल्या गुणपत्रिका, वाणिज्य शाखेचे प्रथम, द्वितीय, तृतीय वर्षाच्या प्रमाणपत्रासाठी १९ हजार ६०० रुपये लागतील असे सांगितले. त्यानुसार पैसे देत व्यवहार ठरवला. ठरल्याप्रमाणे २ सप्टेंबर रोजी आरोपीने प्रमाणपत्र तयार झाल्याचे सांगून, ते घेण्याकरिता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथे ३ सप्टेंबर रोजी येण्यास सांगितले. त्यानुसार पथकाने सापळा रचला. दुचाकीवरून आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेने ताब्यात घेत त्याच्याकडील बनावट प्रमाणपत्रे जप्त केली. त्याच्याविरुद्ध बीकेसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला.        आरोपीच्या चौकशीतून पथकाने चेंबूरच्या वाशी नाका परिसरात छापा टाकला. तेथे शहाच्या कार्यालयातील संगणकावर विविध शैक्षणिक मंडळ, विद्यापीठ यांच्या गुणपत्रिका, ना हरकत प्रमाणपत्रे, शिक्के मिळून आले. कागदपत्रासह संगणक पथकाने जप्त केले. शुक्रवारी दोघांनाही न्यायालयात हजर केले. दोघांनाही ७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.    संगणकावरच चालायचा कारभारमुनावर याने पोलिसांना दिलेल्या माहितीत गेल्या सहा महिन्यांपासून तो अशा प्रकारे बनावट प्रमाणपत्र देण्याचे काम करत आहे. पोलिसांना त्यांच्याकडून १० ते १२ प्रमाणपत्रे मिळाली आहेत. तसेच संगणकावरूनच ही मंडळी हुबेहूब असे प्रमाणपत्र बनवत होती. याबाबत त्यांच्याकडे अधिक तपास सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई