शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Video : धक्कादायक! बंदी असतानाही मुंबईत होतेय कॉम्बॅट ड्रेसची विक्री 

By पूनम अपराज | Updated: March 5, 2019 21:50 IST

मुंबई पोलिसांनी यावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. 

ठळक मुद्देसंपूर्ण देशभरात फॅशन म्हणून वापरले जाणारे आर्मी ड्रेस म्हणजेच कॉम्बॅट ड्रेस विक्री आणि खरेदीस बंदी घालण्यात आली होती. आम्हाला अशा प्रकारच्या कपड्यांची कुठे विक्री सुरु असल्यास माहिती द्यावी अशी आवाहन सिंगे यांनी लोकमतशी बोलताना केले. 

मुंबई - १ जानेवारी २०१५ साली पठाणकोट येथील हवाई तळावर सहा दहशतवादी लष्करी गणवेशात घुसले होते आणि त्यांनी तेथे दहशतवादी हल्ला केला होता. त्यानंतर संपूर्ण देशभरात फॅशन म्हणून वापरले जाणारे आर्मी ड्रेस म्हणजेच कॉम्बॅट ड्रेस विक्री आणि खरेदीस बंदी घालण्यात आली होती. मात्र, मुंबईत रस्त्यावर कपडे विक्री करणाऱ्यांकडे सर्रास असे कपडे विकले जातात. मुंबईत सध्या पुलवामा पार्श्वभूमीवर हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे पठाणकोटप्रमाणे मुंबईत काही समाजविघातक व्यक्ती या ड्रेसचा दुरुपयोग करून घातपात घडवून आणू शकतात. त्यामुळे मुंबई पोलिसांनी यावर कडक कारवाई करणं अत्यंत गरजेचं आहे. 

अगदी १०० ते ९०० रुपयांना हा लष्करी गणवेशासारखा दिसणारा शर्ट, टीशर्ट आणि पँट्स बाजारात उपलब्ध आहेत. या ड्रेसच्या विक्रीवर बंदी असताना देखील पोलीस कारवाई का करत नाहीत याबाबत मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी पोलीस उपायुक्त मंजुनाथ सिंगे यांना विचारले असता त्यांनी देखील अशा प्रकारच्या कपडे विक्रीस आणि खरेदीस बंदी असल्याचे सांगितले. तसेच आम्हाला जिथे या कपड्यांची विक्री आढळून येईल तिथेच विक्री थांबवू, आम्हाला अशा प्रकारच्या कपड्यांची कुठे विक्री सुरु असल्यास माहिती द्यावी अशी आवाहन सिंगे यांनी लोकमतशी बोलताना केले. 

मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वे लोकल देखील दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे. तसेच नुकतेच पश्चिम रेल्वेने देखील मध्य प्रदेश, गुजरात, मुंबई येथील रेल्वे स्थानकांत हायअलर्ट जारी केला आहे. त्यातच पठाणकोट येथे अतिरेक्यांनी आर्मी ड्रेसचा वापर करून घुसून केलेला भयानक हल्ला लक्षात ठेवून सुरक्षा यंत्रणांनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणं जरुरीचे आहे. भारतीय लष्करी गणवेशाचा मला अभिमान असून त्याची फॅशन म्हणून विक्री करण्यास मला कधीही आवडणार नाही म्हणून मी विक्री करत नसल्याचं फॅशन स्ट्रीट येथील विक्रेता संतोष दुबे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. तर दुसऱ्या एक व्यापाऱ्याने हे कपडे बांगलादेश आणि चीनवरून विक्रीसाठी येत असल्याची माहिती दिली. 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईBangladeshबांगलादेशchinaचीनIndiaभारत