शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शिक्षकाकडे सापडले जुन्या नोटांचे घबाड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2020 18:37 IST

भारतीय चलनातून रद्द झालेल्या २३ लाखांच्या नोटा पोलिसांनी केल्या जप्त 

ठळक मुद्देफिरोज अन्सारी (45, रा. साकीनाका, मुंबई) या शिक्षकाकडून या नोटा हस्तगत करण्यात आल्या असून त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.अन्सारी याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठाणे - भारतीय चलनातून रिझर्व बँकेने रद्द केलेल्या एक हजार रुपये मूल्याच्या 2300 अर्थात 23 लाखांच्या नोटा ठाणे  गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने शनिवारी हस्तगत केल्या आहेत. फिरोज अन्सारी (45, रा. साकीनाका, मुंबई) या शिक्षकाकडून या नोटा हस्तगत करण्यात आल्या असून त्याची याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

भारतीय चलनातून रद्द झालेल्या एक हजार रुपये दराच्या चलनी नोटा बदली करुन घेण्यासाठी काहीजण 8 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास ठाण्यातील कोरम मॉल जवळील सेवा रस्त्यावर येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सरक यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक रणवीर बयेस यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कु:हाडे, संदीप बागुल, उपनिरीक्षक सरक, कैलास सोनवणो, पोलीस हवालदार सुनिल जाधव, प्रकाश कदम आणि पोलीस नाईक अमोल देसाई आदींच्या पथकाने या मॉलच्या समोरील रस्त्यावर सापळा रचून अन्सारीला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीमध्ये त्याच्या पाठीवरील सॅकमध्ये भारतीय चलनातून रद्द झालेल्या 23 लाखांच्या एक हजार रुपये दराच्या दोन हजार 300 नोटा हस्तगत करण्यात आल्या. केंद्र सरकारने नोटबंदी केल्यानंतर दिलेल्या मुदतीमध्ये त्या बदलून न घेता तसेच या नोटा चलनात आणणो हे बेकायदेशीर आहे, हे माहित असूनही त्यांनी त्याचा बेकायदेशीररित्या साठा केला. अन्सारी याच्याविरुद्ध वर्तकनगर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपनिरीक्षक सरक याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

'जे डब्ल्यु मेरियट' हॉटेलच्या बाऊन्सर विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

अनैतिक संबंध जपण्यासाठी पतीने केली पत्नी अन् चिमुकल्या मुलीची हत्या 

15 लाखांमध्ये नोटांची बदलीएक हजारांच्या 23 लाखांच्या या जुन्या नोटा खासगी क्लासेस घेणारा हा शिक्षक 15 लाखांमध्ये एका व्यक्तीला देण्याच्या तयारीत होता. आता या नोटा कशा आल्या आणि त्या कोणाला दिल्या जाणार होत्या? याचाही सखोल तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :ArrestअटकthaneठाणेTeacherशिक्षकPoliceपोलिसIndian Currencyभारतीय चलन