शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! आठ बोगस डॉक्टरांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2020 21:57 IST

बेकायदेशीरपणे मृत्यूचे प्रमाणपत्रही दिले; औषधांसह वैद्यकीय सामग्री जप्त

ठळक मुद्देस्टेथोस्कोपसह औषधे तसेच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रेही हस्तगत केल्याची माहिती सूत्रंनी दिली.आठही जणांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.

ठाणे : कोणतेही अधिकृत प्रमाणपत्र किंवा अधिकार नसतानाही मृत्यूचे प्रमाणपत्र देणाऱ्या तसेच रुग्णांच्या जीवाशी खेळून त्यांच्यावर उपचार करणाऱ्या अलोक सिंह (39) याच्यासह आठ तोतया डॉक्टरांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या मध्यवर्ती शोध पथकाने गुरुवारी अटक केली. त्यांच्याकडून स्टेथोस्कोपसह औषधे तसेच बनावट वैद्यकीय प्रमाणपत्रेही हस्तगत केल्याची माहिती सूत्रंनी दिली.कळव्यामध्ये काही तोतया डॉक्टर असून ते लोकांच्या जीवाला धोका निर्माण करून ते त्यांच्यावर उपचार करतात, अशी माहिती कळव्यातील एका दक्ष नागरिकाने ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाला 2019 मध्ये अर्जाद्वारे दिली होती. याच अर्जाची मध्यवर्ती गुन्हे शोध पथकाने सखोल चौकशी केली. यामध्ये तथ्य आढळल्यानंतर महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबईचे अध्यक्ष डॉ. आशुतोष गुप्ता, प्रबंधक दिलीप वांगे, सदस्य डॉ. बाळासाहेब हरपळे तसेच कर्मचारी रमेश पांचाळ आणि मनोज बढे यांच्या मदतीने संबंधित बोगस डॉक्टरांच्या रुग्णालयांवर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले होते. त्यानुसार, पोलीस उपायुक्त दीपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन.टी. कदम यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल होनराव, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण, जमादार विजयकुमार राठोड, शरद तावडे, गोविंद सावंत आणि पोलीस हवालदार ईश्वर बुकाणो आदींच्या पथकाने ६ फेब्रुवारी रोजी कळवा विभागामध्ये वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या बनावट डॉक्टरांच्या रुग्णालयांमध्ये धाड टाकली. या कारवाईमध्ये आलोक सिंह तसेच रामजित गौतम (४७), गोपाल बिश्वास (४०), रामतेज प्रसाद (५०), सुभाषचंद यादव (४७), जयप्रकाश विश्वकर्मा (४०), दीपक विश्वास (४८) आणि सत्यनारायण बिंद (४२) यांनी स्वत:च्या  फायद्यासाठी गोरगरीब लोकांची फसवणूक केल्याचे आढळले. 

त्यांनी आपल्या रुग्णालयात बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र, पदव्या प्रदर्शित करून अ‍ॅलोपॅथी आणि आयुर्वेदिक औषधांचा, इंजेक्शनचा आणि सलाईन उपकरणं आदींचा साठा मोठय़ा प्रमाणात ठेवून अँटीबायोटिक आणि तत्सम ड्रग्ज प्रत्यक्ष रुग्णांना देताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीसह महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसायी कायदा कलम तसेच कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसीन, मुंबई यांच्याकडून देण्यात आलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बोगस प्रमाणपत्रे तसेच औषधांचा साठाही जप्त करून त्यांना अटक केली आहे. आठही जणांना ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणो न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :Arrestअटकdoctorडॉक्टरPoliceपोलिसkalwaकळवा