शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! २५ लाखांच्या खंडणीसाठी तरुणाचा खून; विहिरीत बांधून ठेवला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2020 18:59 IST

दोघे ताब्यात, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

ठळक मुद्देव्यायामासाठी दुचाकीवरून गेला तो घरी परत आलाच नाही तो नेहमीप्रमाणे ११ डिसेंबर २०१९ रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला होता. वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

सातारा - २५ लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

आशिष साळुंखे, साहिल शिकलगार (दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याला व्यायामाची आवड होती. तो नेहमीप्रमाणे ११ डिसेंबर २०१९ रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.

पत्नीच्या अतिस्वच्छतेला वैतागला, तिची हत्या करून स्वत:ही गळफास घेतला!

 

अत्याचार करून चिमुकलीची हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा

 

विहिरीत मृतदेह बांधून ठेवलातेजसचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नागठाणे येथील एका विहिरीमध्ये तळाला बांधून ठेवला. पोलिसांनी शुक्रवारी मोटार लावून पाणी बाहेर काढले. त्यानंतर तेजसचा मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. या दोघांनी तेजसचे नेमके कसे अपहरण केले, याची कसून चौकशी पोलीस करत आहेत.

दरम्यान, आष्टे गावापासून जवळच तेजसची दुचाकी तो बेपत्ता झाला त्याच दिवशी सापडली होती. त्या ठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा सारा प्रकार वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता. गत दोन महिन्यांपासून तेजसचा सर्वजण शोध घेत होते. याचवेळी एकाचा तेजसच्या वडिलांना फोन आला. ‘तुमच्या मुलाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे,’ असे त्यांना सांगण्यात आले. या फोनची माहिती त्यांनी बोरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आशिष साळुंखे याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याकडून फारसी माहिती उपलब्ध न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी या खून प्रकरणाचा उलगडा झाला. आशिष साळुंखे आणि त्याचा मित्र साहिल शिकलगार यांना पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहही दाखविला.

 

टॅग्स :MurderखूनKidnappingअपहरणExtortionखंडणीPoliceपोलिसArrestअटकSatara areaसातारा परिसर