शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कुत्र्याला मारहाण केल्याचा जाब विचारल्याने सख्ख्या भावाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 21:32 IST

कुत्र्याच्या मारहाणीवरून दोन भावांत झालेल्या भांडणादरम्यान आरोपीने आपल्या भावाला धक्का दिला होता.  या धक्क्यामुळे खाली जमिनीवर डोकं आपटल्याने डोक्याला जबर मर लागून मृत्यू झाला.

ठळक मुद्देया धक्क्यामुळे खाली जमिनीवर डोकं आपटल्याने डोक्याला जबर मर लागून मृत्यू झालावडील बसुराज यांनी केलेल्या तक्रारीनंतर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाहनुमंता याला दारुचं व्यसन होतं आणि तो वारंवार कुटुंबीयांशी भांडत

मुंबई - कुत्र्याला मारहाण करण्यापासून रोखल्याने आपल्या सख्ख्या भावाची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. विलेपार्ले परिसरात ही अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याच्या मारहाणीवरून दोन भावांत झालेल्या भांडणादरम्यान आरोपीने आपल्या भावाला धक्का दिला होता. या धक्क्यामुळे खाली जमिनीवर डोकं आपटल्याने डोक्याला जबर मर लागून मृत्यू झाला. शुक्रवारी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी आरोपी भावाला अटक केली आहे.

हनुमंता कोळेकर शेजारच्या पाळीव कुत्र्याला मारहाण करत होता. यामुळे त्याचा भाऊ शिवा चिडला होता. त्याने हनुमंताला थांबवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अत्यंत रागात असलेल्या हनुमंताने शिवाला जोरदार धक्का दिला. त्यानंतर खाली पडला असता शिवाच्या डोक्याला जबर मार लागला आणि बेशुद्ध पडला. बेशुद्ध अवस्थेत शिवाला रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. रुग्णालयाने त्याला मृत घोषित केले. वडील बसुराज यांनी केलेल्या तक्रारीनंतर जुहू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जुहू पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही भाऊ बेरोजगार होते. हुनमंता याला दारुचं व्यसन होतं आणि तो वारंवार कुटुंबीयांशी भांडत असे असं त्याच्या वडिलांनी सांगितलं आहे. हनुमंताची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसArrestअटक